महिलांनी वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडू लागतात. हार्मोनल बदल आणि वाढते वय यामुळे वयाच्या चाळिशीनंतर स्वतःला फिट ठेवणे हे एक मोठे आव्हानच असते. मेटाबॉलिझम कमी होणे, थकवा जाणवणे, वजन वाढणे आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या हळूहळू (Chinese lifestyle habits for fitness) डोके वर काढतात. अशावेळी फिट आणि निरोगी राहण्यासाठी केवळ आधुनिक उपचारांसोबतच पारंपारिक पद्धतींकडेही लक्ष देणं गरजेचं ठरतं. पारंपारिक चिनी औषधशास्त्र (Traditional Chinese Medicine) फिटनेसकडे बघण्याचा एक वेगळा आणि सोपा दृष्टिकोन देते. चिनी संस्कृतीत फिटनेस म्हणजे केवळ जिममध्ये जाणे नव्हे, तर शरीराचा अंतर्गत समतोल राखणे होय(easy daily habits to stay fit after 40 naturally).
नुकतेच लाईफस्टाईल कोच सारा जेन हो (Sara Jane Ho) यांनी या विषयावर मोकळेपणाने आपले विचार मांडले आहे आणि चिनी पारंपारिक पद्धतींचा अवलंब करून त्यांनी वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही स्वतःला कसं मेंटेन ठेवलं आहे, हे सांगितलं आहे. चिनी औषधशास्त्रानुसार, फिटनेस म्हणजे फक्त मसल्स बनवणे नसून शरीरातील उर्जेचा समतोल राखणे होय. प्रसिद्ध कोच सारा जेन हो यांनी सांगितलेले हे पारंपारिक चिनी मार्ग वापरून तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षीही विशीतल्या तरुणहीसारखेच फिट दिसू शकता. पारंपारिक चिनी औषधशास्त्रानुसार शरीर, मन आणि ऊर्जा यांचा समतोल राखणं हे आरोग्याचं मुख्य रहस्य आहे. योग्य आहार, दिनचर्या, औषधी वनस्पती आणि विशिष्ट थेरपींच्या मदतीने शरीराची कार्यक्षमता सुधारण्यावर या पद्धतीत भर दिला जातो. विशेषतः चाळीशी नंतर शरीरातील बदल लक्षात घेऊन जीवनशैलीत केलेले छोटे बदल दीर्घकाळ फिट राहण्यासाठी (Chinese secrets to stay lean and healthy after age 40) मदत करू शकतात. जर तुम्हालाही वाढत्या वयानुसार फिट, ॲक्टिव्ह आणि ऊर्जावान राहायचं असेल, तर पारंपारिक चिनी औषधशास्त्र काय सांगतं हे जाणून घेणं नक्कीच उपयुक्त ठरेल.
वयाच्या चाळिशी नंतरही फिट आणि टोन्ड राहणायसाठी खास उपाय...
१. दिवसभर कोमट पाणी प्या :- चिनी आरोग्य परंपरेत 'कोमट पाण्याला' एका औषधाप्रमाणे मानले जाते. दिवसभर कोमट पाणी प्यायल्यामुळे तुमची पचनसंस्था ॲक्टिव्ह राहते. यामुळे तुमचे पोट नियमितपणे साफ होण्यास मदत होते, जी वजन कमी करण्याच्या प्रवासातील पहिली पायरी मानली जाते. याशिवाय, कोमट पाणी शरीराचे तापमान संतुलित राखते आणि मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे शरीरात विषारी घटक किंवा घाण जमा होत नाही.
कोणताही खर्च न करता घरबसल्या वेटलॉस करण्यासाठी ८ टिप्स! जिम - डाएट विसरा, 'असं' घटवा वाढलेलं वजन...
२. सकाळी उठून एक्सरसाइज करा :- वर्कआऊटचा अर्थ नेहमी हेवी वजन उचलणे किंवा स्वतःला पूर्णपणे थकवून टाकणे असा होत नाही. सकाळच्या वेळी हायकिंग (Hiking), पिलेट्स (Pilates) किंवा टेनिस यांसारखे खेळ खेळून देखील आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हीटी करु शकता. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर शरीराला रिकव्हरीसाठी जास्त वेळेची गरज असते, त्यामुळे खूप जास्त तीव्र वर्कआऊट (HIIT) करण्याऐवजी सातत्य राखण्यावर भर द्या. सकाळी उठल्या उठल्या एक्सरसाइज पूर्ण करा.
डिलिव्हरीनंतर सुटलेलं पोट कमी करण्याचे ५ उपाय, १ रुपया खर्च न करता-पोट होईल कमी...
३. बाहेरच्या आर्द्रतेपासून शरीराचा बचाव करा :- चिनी वैद्यकीय पद्धतीमध्ये ओलावा हे शरीरातील सूज आणि सुस्तीचे मुख्य कारण मानले जाते. आंघोळीनंतर तुमचे केस ब्लो-ड्राय करून नीट सुकवा. ओले केस शरीरात थंडावा आणि आर्द्रता निर्माण करू शकतात. याशिवाय, पायांच्या माध्यमातूनही बाहेरची थंडावा आणि ओलावा शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे ब्लोटिंग (पोट फुगणे) आणि शरीरात जडपणा जाणवू शकतो. हे टाळण्यासाठी मोजे घालणे ही एक उत्तम सवय आहे.
४. 'ची' (Qi) आणि रक्तभिसरणावर लक्ष द्या :- चिनी मान्यतेनुसार, जर तुमच्या शरीरातील ऊर्जा (ज्याला ते 'ची' किंवा Qi म्हणतात) आणि रक्ताभिसरण योग्य नसेल, तर वजन वाढू लागते. मणका सरळ ठेवण्यासाठी आणि नसांमधील अडथळे (Blocks) दूर करण्यासाठी आठवड्याला एक्यूपंक्चर (Acupuncture) किंवा कायरोप्रॅक्टरची (Chiropractor) मदत घेणे फायदेशीर ठरते. जर तुमच्या मासिक पाळीला उशीर (Late Periods) होत असेल, तर याचा अर्थ असा आहे की शरीरातील 'ची' (Qi) ऊर्जा आणि रक्ताभिसरण मंदावले आहे. जेव्हा हे अभिसरण मंद होते, तेव्हा शरीर पाणी आणि टाकाऊ पदार्थ साठवू लागते, ज्याला आपण अनेकदा 'वजन वाढणे' असे समजतो.
