Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डिलिव्हरीनंतर सुटलेलं पोट कमी करण्याचे ५ उपाय, १ रुपया खर्च न करता-पोट होईल कमी...

डिलिव्हरीनंतर सुटलेलं पोट कमी करण्याचे ५ उपाय, १ रुपया खर्च न करता-पोट होईल कमी...

how to reduce belly fat after pregnancy : how to lose tummy after delivery : डिलिव्हरीनंतर लाटणार पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2026 14:20 IST2026-05-02T13:57:26+5:302026-05-02T14:20:34+5:30

how to reduce belly fat after pregnancy : how to lose tummy after delivery : डिलिव्हरीनंतर लाटणार पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय...

how to reduce belly fat after pregnancy how to lose tummy after delivery | डिलिव्हरीनंतर सुटलेलं पोट कमी करण्याचे ५ उपाय, १ रुपया खर्च न करता-पोट होईल कमी...

डिलिव्हरीनंतर सुटलेलं पोट कमी करण्याचे ५ उपाय, १ रुपया खर्च न करता-पोट होईल कमी...

आई होणे हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, नऊ महिन्यांच्या या प्रवासानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. यामध्ये सर्वात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे 'डिलिव्हरी नंतर लटकणारे पोट'. प्रेग्नेंसीमध्ये बाळाच्या वाढीसाठी पोटाचे स्नायू विस्तारले जातात, ज्यामुळे डिलिव्हरी नंतर त्वचा सैल पडते आणि पोटाचा घेर वाढलेला दिसतो. अनेक महिलांना हे वाढलेले पोट कमी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, पण बिझी डेली रुटीनमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे थोडे कठीण होते(how to reduce belly fat after pregnancy).

 डिलिव्हरीनंतर अनेक महिलांना पोट सैल होणं किंवा लटकलेलं दिसणं ही फारच कॉमन समस्या जाणवते. शरीरात झालेले हार्मोनल बदल, वजन वाढ आणि स्नायू सैल होणं यामुळे हा बदल दिसून येतो. त्यामुळे अनेकींचा आत्मविश्वास कमी होतो आणि पूर्वीसारखा फिट लूक मिळवणं कठीण वाटतं. पण काळजी करण्याची गरज नाही, योग्य सवयी, हलके व्यायाम (how to lose tummy after delivery) आणि संतुलित आहार याच्या मदतीने (how to reduce belly fat naturally after pregnancy) हळूहळू पोट कमी करता येऊ शकतं.

डिलिव्हरीनंतर लाटणार पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय... 

१. 'बेली बाइंडिंग' किंवा मॅटर्निटी बेल्टचा वापर :- डिलिव्हरी झाल्यानंतर पोटाला सुती कापडाने किंवा पट्ट्याने (Maternity Belt) बांधण्याची जुनी पद्धत आजही तितकीच फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या सैल पडलेल्या स्नायूंना आधार मिळतो आणि ते हळूहळू मूळ जागी येण्यास मदत होते. विशेषतः सिझेरियन झाले असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पट्टा वापरल्यास टाके भरून येण्यास आणि पोटाचा आकार सावरण्यास मदत होते.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

२. हलका व्यायाम आणि ब्रिथिंग एक्सरसाइज :- डिलिव्हरीनंतर लगेच हेवी एक्सरसाइज करणे शक्य नसते, अशावेळी 'ब्रिदिंग एक्सरसाइज' सर्वोत्तम ठरतात. ताठ बसून दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडताना पोट जास्तीत जास्त आत ओढून धरण्याचा प्रयत्न करणे (Abdominal Breathing), याने पोटाच्या अंतर्गत स्नायूंना व्यायाम मिळतो. तसेच, दररोज किमान १५ ते २० मिनिटे संथ गतीने चालल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

३. कोमट पाणी आणि ओव्याचा काढा :- शरीरातील सूज (Infection/Swelling) कमी करण्यासाठी कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. कोमट पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि चयापचय वेगवान होतो. त्यासोबतच, रोज थोडा ओवा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने पोटातील गॅस कमी होतो आणि पोट आत जाण्यास मदत होते. हे 'डिटॉक्स ड्रिंक' नैसर्गिकरित्या चरबी जाळण्याचे काम करते.

ना जिम ना फॅन्सी डाएट, घरीच करा ७ व्यायाम, ढेरी कमी होऊन महिनाभरात दिसू लागाल फिट...

४. डिलिव्हरीनंतर पोटासाठी कोअर एक्सरसाइजेस :- डिलिव्हरीनंतर केवळ चालणे पुरेसे नसते, तर पोटाच्या अंतर्गत स्नायूंना पुन्हा ॲक्टिव्ह करणे गरजेचे असते. पेल्विक टिल्ट हा एक्सरसाइज पोटाच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी देतो आणि पाठीच्या कण्याला आधार देतो. ओटीपोटाच्या स्नायूंसाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे डिलिव्हरीनंतर सैल पडलेले स्नायू पुन्हा घट्ट होण्यास मदत होते.

५. संतुलित आणि पौष्टिक आहार :- पोट कमी करणे म्हणजे उपाशी राहणे नव्हे, तर शरीराला आवश्यक पोषक तत्वे देऊन अतिरिक्त चरबी (Fat) जाळणे होय. योग्य आहारामुळे शरीर लवकर रिकव्हर होते आणि उर्जेची पातळी टिकून राहते. आहारात डाळी, कडधान्ये, पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. प्रोटीनमुळे स्नायूं मजबूत होण्यास मदत होते आणि पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. ताजी फळे, पालेभाज्या, ओट्स आणि तृणधान्ये यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. फायबरमुळे पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोटावर साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते. प्रोसेस्ड केलेले पदार्थ जास्त तेलकट-तूपकट पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले गोड पदार्थ खाणे टाळा. यामुळे शरीरात अनावश्यक कॅलरीज साचतात आणि पोटाचा घेर वाढतो.

Web Title : डिलीवरी के बाद पेट की चर्बी कम करें: 5 मुफ्त उपाय, पेट होगा कम

Web Summary : डिलीवरी के बाद पेट की चर्बी कम होना आम बात है। पेट को बांधना, सांस लेने के व्यायाम जैसे हल्के व्यायाम, अजवाइन के साथ गर्म पानी पीना, कोर व्यायाम और संतुलित आहार गर्भावस्था के बाद पेट की चर्बी को प्राकृतिक रूप से कम करने के उपाय हैं।

Web Title : Reduce post-pregnancy belly fat: 5 cost-free tips for a flatter stomach.

Web Summary : Post-delivery belly fat is common. This article suggests belly binding, light exercise like breathing exercises, drinking warm water with carom seeds, core exercises, and a balanced diet to naturally reduce belly fat after pregnancy without spending money.