Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मिश्र डाळींची खिचडी, वेट लॉस करणाऱ्यांसाठी परफेक्ट मेन्यू, घ्या सोपी रेसिपी

मिश्र डाळींची खिचडी, वेट लॉस करणाऱ्यांसाठी परफेक्ट मेन्यू, घ्या सोपी रेसिपी

Mix Dal Khichadi: डाळ तांदळाची खिचडी खाऊन वजन, शुगर वाढण्याची चिंता वाटत असेल तर पुढे सांगितलेली मिश्र डाळींची खिचडी खायला सुरुवात करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 13:55 IST2026-05-16T13:54:27+5:302026-05-16T13:55:27+5:30

Mix Dal Khichadi: डाळ तांदळाची खिचडी खाऊन वजन, शुगर वाढण्याची चिंता वाटत असेल तर पुढे सांगितलेली मिश्र डाळींची खिचडी खायला सुरुवात करा...

mix dal khichadi, how to make daal khichadi, easy and simple recipe of daal khichadi  | मिश्र डाळींची खिचडी, वेट लॉस करणाऱ्यांसाठी परफेक्ट मेन्यू, घ्या सोपी रेसिपी

मिश्र डाळींची खिचडी, वेट लॉस करणाऱ्यांसाठी परफेक्ट मेन्यू, घ्या सोपी रेसिपी

खिचडी हा बहुसंख्य भारतीय लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. रात्रीच्या जेवणात खिचडी असली की बस्सं... खिचडीवर वाढलेलं गरमागरम तूप, त्याच्यासोबत तोंडी लावायला पापड आणि लोणचं... जेवण अगदी मस्त होऊन जातं. पण हल्ली वजन आणि शुगर वाढेल म्हणून कित्येक लोकांना आवडत असूनही खिचडी खायला नको वाटतं. हीच अडचण तुमचीही असेल तर मिश्र डाळींची खिचडी करून खाऊन पाहा. ही खिचडी अतिशय पौष्टिक असते. तिच्यामध्ये डाळी जास्त असल्याने प्रोटीन्सही चांगले मिळतात आणि शिवाय वजन आणि शुगर वाढण्याचीही चिंता नसते. ही खिचडी नेमकी कशी करायची ते पाहुया...(Mix Dal Khichadi)

मिश्र डाळींची खिचडी करण्याची रेसिपी

 

साहित्य

अर्धी वाटी मसूर डाळ 

अर्धी वाटी उडीद डाळ

अधिक मास: स्टीलचंच ताट कशाला? जावयाला नव्या पद्धतीच्या सुंदर तबकात द्या वाण, लेकही होईल खुश

१ वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ

फाेडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे 

बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो..

 

कृती

मिश्र डाळींची खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी तर सगळ्या डाळी एकत्र करा. दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर तांदूळ वेगळे धुवून घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. धुवून घेतलेल्या डाळी कुकरमध्ये घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून ते ही भाजून घ्या. डाळ- तांदुळामधला ओलसरपणा कमी झाल्यानंतर त्यात पाणी, हळद, मीठ घालून कुकरचं झाकण लावा आणि मंद ते मध्यम आचेवर शिजवून घ्या.

या खिचडीला वरतून फोडणी घाला. त्यासोबत कांदा, टाेमॅटोही परतून खिचडीमध्ये घाला. मस्त चवदार वेटलॉस खिचडी तयार. 

 

Web Title : मिश्र दाल खिचड़ी: वजन घटाने के लिए उत्तम, बनाने में आसान!

Web Summary : मिश्र दाल खिचड़ी एक पौष्टिक और प्रोटीन युक्त व्यंजन है, जो वजन घटाने के लिए आदर्श है। इस रेसिपी में मिश्रित दालों और चावल को भूनकर, फिर मसालों के साथ पकाया जाता है। सरसों के बीज, जीरा और सब्जियों का तड़का स्वाद बढ़ाता है। इस स्वस्थ और स्वादिष्ट भोजन का आनंद लें।

Web Title : Mixed Dal Khichdi: Perfect weight loss recipe, easy to make!

Web Summary : Mixed dal khichdi is a nutritious and protein-rich dish, ideal for weight loss. This recipe involves roasting mixed lentils and rice, then cooking them with spices. A tempering of mustard seeds, cumin, and vegetables adds flavor. Enjoy this healthy and delicious meal.