शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रत्नागिरीकरांना मिळणार पाणीसुख!

By admin | Updated: February 18, 2015 00:56 IST

नगर परिषदेचे पाऊल पडते पुढे : पाईपलाईन बदलणार, अंदाजे ५७ कोटी रूपये खर्च

प्रकाश वराडकर,रत्नागिरी :गेल्या सहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील महादोषांमुळे जो त्रास सहन करावा लागत आहे तो लवकरच दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सुजल-निर्मल अभियानअंतर्गत या कामांना निधी मिळणार असून, पाणी वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामांची अंदाजपत्रके नगरपरिषद या महिन्यात शासनाकडे पाठविणार आहे. या सर्व कामांसाठी ५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण होणार असल्याने पाण्याचे सुख मिळण्याबाबत रत्नागिरीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण, नाचणे तलाव तसेच एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा केला जातो. यातील सर्वाधिक पाणीपुरवठा हा शीळ धरणातून होतो. गेल्या काही वर्षांपासून शीळ धरणातील ५० टक्के पाणी शहरासाठी वापरले जात होते. मात्र, अलिकडेच या धरणाचे १०० टक्के पाणी वापरण्याबाबत पालिकेने करार केला आहे. शीळ धरणात पाण्याचा मुबलक साठा असूनही गंजलेली जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या समस्येमुळे पाणी असून, तहानलेले राहण्याची वेळ अनेकदा रत्नागिरीकरांवर येते. त्यामुळेच शीळ धरणाच्या जॅकवेलपासून ते पुढे २ किलोमीटर्सपर्यंत गंजलेली जलवाहिनी संपूर्णत: बदलली जाणार आहे. त्यासाठी सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी शहराला दररोज पानवल धरणातून दीड ते दोन दललक्ष लिटर्स, शीळ धरणातून १२ दशलक्ष लिटर्स तर एमआयडिसीकडून दीड दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. नाचणे तलावातूनही काही प्रमाणात शहराला पाणी पुरवले जाते. पायाशी खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत केले जाणार आहे. शीळ धरणातून पाणी उपसा करण्यासाठी याआधीचे ३०० अश्वशक्तीचे तीन पंप बदलून २५० अश्वशक्तीचे तीन नवीन पंप बसविण्यात आले आहेत. आधीच्या पंपांची शक्ती अधिक असल्याने त्यांची आवश्यकता नसल्याचे तसेच वीजबीलही अधिक येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा बदल करण्यात आला. परिणामी पालिकेच्या वीज बिलातही घट झाल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.