शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आजची सर्वसाधारण सभा गाजणार?

By admin | Updated: December 28, 2015 00:43 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून जोरदार गाजणार आहे. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खिंडीत गाठण्याची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांकडून आखण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच निवळी येथील मुख्याध्यापकांच्या निलंबनाच्या प्रश्नावरून जिल्हा परिषदेतील वातावरण तापले होते. हा मुद्दाही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजण्याची शक्यता आहे.स्थायी समितीची सभाही विविध अपुऱ्या विषयांमुळे स्थगित करण्यात आली होती. त्यापैकी काही मुद्दे मार्गी लागल्याने नंतर घेण्यात आलेली सभा गाजावाजा न होता आटोपती घेण्यात आली होती. दरम्यान, काही शिक्षकांनी प्रशासनाकडे पदावनती मागितली होती. त्याचवेळी त्या शिक्षकांनी पदावनतीनंतर अन्य शाळा मागितली होती. याबाबत पदाधिकाऱ्यांनीही त्या शिक्षकांना अन्य शाळा देण्यात यावी, असा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे न करता त्या शिक्षकांना पदावनतीनंतर त्याच शाळेत ठेवले. त्यामुळे शिक्षकांसह पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरलेली आहे.निवळी तिठा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेचे तत्काळ निलंबन प्रकरणीही या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरही विषय असून, ते गाजण्याची शक्यता असून, तशी तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर अविश्वास ठराव आणण्याच्या दृष्टीने सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यापूर्वी होणारी ही सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील सर्वसाधारण सभा तीन दिवस चालली होती. त्याप्रमाणेच ही सभाही किती दिवस चालते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)