दादर पॅसेंजरमधून मंगळसूत्राची चोरीचिपळूण : दादर-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजता माणगाव स्थानकादरम्यान घडली. मात्र चेन ओढूनही गाडी न थांबल्याने चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत खेड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिप्ती दशरथ मोरे असे मंगळसूत्र चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्या आरक्षित डब्यातून मुलासह प्रवास करत होत्या. गाडी माणगाव स्टेशनवरुन सुटत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५ तोळ्याचे मंगळसूत्र खेचले. हा प्रकार लक्षात आल्याने प्रवाशांनी तत्काळ गाडीची चेन ओढली. मात्र गाडी थांबली नाही. त्यामुळे चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. या चोरट्याने पांढऱ्या रंगाचे टी शर्ट व फूल पँट परिधान केली होती असे मोरे यांनी खेड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. येथील पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी माणगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)
दादर पॅसेंजरमधून मंगळसूत्राची चोरी
By admin | Updated: March 8, 2017 17:18 IST