शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

धक्कादायक पराभव

By admin | Updated: May 17, 2014 00:08 IST

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजीचा किंबहुना राणेंविरोधी भावनेचा उद्रेक मतदानातून झाला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजीचा किंबहुना राणेंविरोधी भावनेचा उद्रेक मतदानातून झाला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांचा तब्बल दीड लाख मतांनी धक्कादायक पराभव झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली असून, नारायण राणे यांच्या वर्चस्वाला जबर धक्का बसला आहे. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत या मतदारसंघाचे सोळावे खासदार म्हणून विजयी झाले आहेत. या विजयाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी रत्नागिरीत येऊन रत्नागिरीकरांना अभिवादन करतानाच विजयी उमेदवार विनायक राऊत यांचे अभिनंदन केले. २००९ मध्ये खासदार बनलेले कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा यावेळचा पराभव उद्योगमंत्री राणे यांच्या जिव्हारी लागला. त्यांचेच होमपीच असलेल्या सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात नीलेश राणे यांची पीछेहाट झाली. सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. कणकवलीत राऊत यांना अल्प मताधिक्यावर समाधान मानावे लागले. सावंतवाडी मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांच्याविरोधात केलेल्या बंडाचे पडसाद मतदान यंत्रातून प्रकर्षाने दिसून आले. त्या मतदारसंघात सेनेच्या विनायक राऊत यांना तब्बल ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असतानाही तेथे सेनेच्या राऊत यांना ३७ हजारांचे मताधिक्य मिळाले. राजापूरमध्ये २२ हजार मताधिक्य राऊत यांना मिळाले. केवळ कणकवली मतदारसंघात राऊत यांना १३७७ एवढे अल्प मताधिक्य मिळाले. संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीने पक्ष कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. नीलेश राणे व राज्यातील कॉँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या विधानसभा मतदार संघांसह कणकवली आणि कुडाळ या नारायण राणे यांच्या प्रभावक्षेत्रातही नीलेश राणे यांची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे या पराभवाची कारणमिमांसा आता राणे कुुटुंबियांना व कॉँग्रेसलाही करावी लागणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीतील फूूड कॉर्पोरेशनच्या इमारतीत सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सेनेचे विनायक राऊत यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. मताधिक्याचा ग्राफ उंचावत गेला तो दीड लाखांपर्यंत पोहोचला. प्रत्येक फेरीत राऊत यांना मिळालेले मताधिक्य याप्रमाणे : १-५९१९, २-७७८५, ३-५३९३, ४-५०९३, ५-९७००, ६-९०८४, ७-७४६३, ८-७०३८, ९-३७६७, १०-५४०४, ११-९९५९, १२-७१९४, १३-७८२३, १४-४०४५, १५-८८३८, १६-७१९१, १७-६७५७, १८-५२४१, १९-४४८६, २०-७६७२, २१-५३५६, २२-३७७१, २३-२६९७, २४-१८०२, २५-६२२. पहिल्या चार ते पाच फेर्‍यांतच निवडणूक निकालाचा कल स्पष्ट दिसून येत होता. पाचव्या फेरीत राऊत यांनी ९७०० मताधिक्य मिळविल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला. कारण पुढील सर्वच फेर्‍यात राऊत यांना मताधिक्य मिळत असल्याचे वृत्तही तोपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले होते. सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान उमेदवार नीलेश राणे मतमोजणी केंद्रात येऊन काही वेळातच निघून गेले. मात्र, महायुतीचे कार्यकर्ते विजयाचा अंदाज येताच मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करू लागले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य राऊतना मिळाले नंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)