शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीसाठीची जमीन योजना ठप्पच

By admin | Updated: February 11, 2016 00:30 IST

कोकणासह इतर जिल्ह्यातही परिणाम : जमीनच मिळत नसल्याने कारण देत योजना बासनात

शोभना कांबळे -- रत्नागिरी -दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजुरांना कसण्याकरिता चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने कार्यान्वित केलेली आहे. मात्र, जमीन उपलब्ध होत नसल्याचे कारण दाखवून कोकणासह इतर जिल्ह्यांत ही योजना सध्या ठप्पच आहे. मागासवर्गियांच्या एकंदरीत योजनांचा विचार करता बहुतांश योजना या लाभार्थ्यांकरिता केवळ गाजरच ठरत आहेत.राज्य शासनाने ‘पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ या नावाने सुरू केली होती. अनुसूचित जाती नवबौद्धांमधील दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढावेत, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने १ एप्रिल २००४ साली ही योजना राज्यात सुरू केली असून, तिची अंमलबजावणी २००५ सालापासून झाली आहे. या योजनेअंतर्गत २००५ ते २०१३ या कालावधीत राज्यभरातून ११ हजार ७४०.१८ एकर जमीन खरेदी करून तिचे १४४८ लाभार्थींना वाटप करण्यात आले आहे. २९५२.३२ हेक्टर बागायती, तर ८७४७.८६ हेक्टर जिरायती जमिनीचा त्यात समावेश आहे. त्यापैकी १३०० लाभार्थी नाशिक विभागातील आहेत. या विभागातील नाशिक २३६, धुळे ३२०, नंदूरबार १८४, जळगाव ३२७ आणि अहमदनगर जिल्ह्यातील २९४ लाभार्थींनी लाभ घेतला. अमरावती तसेच पुणे जिल्ह्यांतील लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, मुंबईसह उर्वरित कोकणातील जिल्ह्यांनी जमीन उपलब्ध नसल्याचे कारण सांगून हात झटकले आहेत. काही जिल्हेवगळता कोकणात त्याचा आजपर्यंत एकही लाभार्थी नाही. या योजनेला कोकणात घरघर लागली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून भारंभार योजना जाहीर केल्या जातात. मात्र, त्या योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने होते की नाही? याची शहानिशा होत नाही आणि झाली तर त्याच्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत़जमिनीचे दर ३ लाख प्रतिएकरी असे ठरवून दिले आहेत़ ही जमीन जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी, असे सुधारित योजनेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या मुंबईसह कोकणातील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असल्याने प्रतिएकर तीन लाख रूपये दराने मिळणे अशक्य होत आहे. त्यामुळे ठराविक जिल्हेवगळता उर्वरित महाराष्ट्रात ही योजना लाभार्थींकरिता गाजरच ठरली आहे.समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना, उपक्रम यांची प्रसिद्धी योग्यरित्या होत नसल्याने त्या लाभार्थींपर्यंतच पोहोचतच नाहीत. ज्या योजना पोहोचतात, त्यांचा उपयोग होत नसल्याने आता मागासवर्गीय लाभार्थीही सामाजिक न्याय विभागाच्या या योजनांकडे पाठ फिरवू लागले आहेत.जमीन खरेदीसाठी सुधारित कार्यपद्धती जिल्हाधिकारी यांनी रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन विकत घ्यावी. उपलब्ध होत नसेल तर मुल्याबाबत मालकाशी वाटाघाटी कराव्यात, तरीही मिळत नसल्यास रेडीरेकनरच्या दुप्पट किंमत वाढविण्यात यावी, ही रक्कम प्रतिएकरी ३ लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत असावी.अशी आहे योजनालाभार्थीला ४ एकर कोरडवाहू किंंवा २ एकर बागायती जमीन देण्यात येते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के बिनव्याजी कर्ज दिले जाते. लाभार्थींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाते़जमीन खरेदीसाठी सुधारित कार्यपद्धती जिल्हाधिकारी यांनी रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन विकत घ्यावी. उपलब्ध होत नसेल तर मुल्याबाबत मालकाशी वाटाघाटी कराव्यात, तरीही मिळत नसल्यास रेडीरेकनरच्या दुप्पट किंमत वाढविण्यात यावी, ही रक्कम प्रतिएकरी ३ लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत असावी.