रत्नागिरी : महावितरणतर्फे बँका, पतसंस्था, पोस्ट कार्यालये तसेच त्यांच्या कार्यालयामध्ये वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणी तासन्तास वेळ वाया घालविण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटव्दारे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, त्यांना एटीपीव्दारे बिल भरणे शक्य होत आहे. एटीपीमध्ये सुटीच्या दिवशीही बिल भरणे शक्य होत असल्यामुळे ग्राहकांचा एटीपीकडे कल अधिक आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात एटीपीद्वारे महावितरण कंपनीला २२ कोटी ३६ लाख २३ हजार ६६३ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.स्वयंचलित वीजबिल भरणाकेंद्र २४ तास खुले असते. महावितरणचीे रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली व मालवण येथे केंद्र आहेत. दोन्ही जिल्ह्यातून जानेवारी ते जूनअखेर एकूण १ लाख ८१ हजार ७८६ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे २२ कोटी ३६ लाख २३ हजार ६६३ रुपयांचा महसूल जमा केला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी विभागात सर्वाधिक ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे. ७३ हजार ३०२ ग्राहकांनी वीजबिल एटीपीवर भरल्यामुळे ९ कोटी ९८ लाख ११ हजार ५४४ रुपयांचा महसूल जमा केला आहे. चिपळूण विभागातून ३९ हजार ७७७ ग्राहकांनी ६ कोटी ६ लाख एक हजार ११७, खेड तालुक्यातील ७ हजार ६३७ ग्राहकांनी ६९ लाख ६५ हजार १२०, दापोली तालुक्यातील ८ हजार २२९ ग्राहकांनी ७१ लाख ५४ हजार ७७४ रुपयांचा महसूल भरला आहे. कणकवली येथील ३२ हजार ४५५ ग्राहकांनी २ कोटी ४२ लाख १५ हजार २३०, तर मालवण येथील एटीपी केंद्रावर २० हजार ३८६ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे २ कोटी ४८ लाख ७५ हजार ८७८ महसूल गोळा केला आहे.रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा एटीपी केंद्रांवर जानेवारीमध्ये २९ हजार ४६८ ग्राहकांनी ४ कोटी १२ लाख ६१ हजार ९३० रूपये, फेब्रुवारीमध्ये २८ हजार ८०५ ग्राहकांनी ३ कोटी ५२ लाख ९ हजार ७२४, मार्चमध्ये ४२ हजार २३ ग्राहकांनी ४ कोटी ८६ लाख ४५ हजार ६२२ रुपयांचा महसूल जमा केला. एप्रिलमध्ये २७ हजार १२६ ग्राहकांनी २ कोटी ७१ लाख २० हजार ७६५, मे महिन्यात ३० हजार ४०६ ग्राहकांनी ३ कोटी ६९ लाख ३६ हजार २१५, जूनमध्ये २३ हजार ९५८ ग्राहकांनी ३ कोटी ४४ लाख ४९ हजार ४०७ रूपयांचा महसूल भरला आहे. सर्वाधिक महसूल मार्चमध्ये भरलेला दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
एटीपीमुळे २२ कोटी ३६ लाखांचा महसूल
By admin | Updated: August 4, 2015 23:47 IST