रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोडजवळील रत्नदीप पॅलेसमधील एका ब्लॉकचे कुलुप कोणत्यातरी चावीने उघडून आतील २० गॅ्रम वजनाची सोनसाखळी व ३५ हजार रुपये रोख रक्कम मिळून ९१ हजारांची चोरी झाल्याची तक्रार संगीता दिलीप साळुंखे (रत्नदीप पॅलेस, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसात दाखल केली असून संशयित आरोपी म्हणून रेणुका बबन जिजे (२१, हिंदू कॉलनी, रत्नागिरी) हिला पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली आहे. दि. २२ मे २०१४ रोजी सकाळी ६ वाजता ते रात्री ११ वाजता या दरम्यान ही चोरी झाली होती. संशयित ही कामवाली असून तिनेच कोणत्यातरी चावीने कुलुप दरवाजाचे कुलुप उघडून ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून ४५४, ४५७ व ३८० भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक संजय चौधर अधिक तपास करीत आहेत. रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ सध्या वाढला आहे. वारंवार होणार्या चोर्यांमुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत. शुक्रवार दि. २३ मे रोजी रत्नागिरी शहरात दिवसा दहापेक्षा अधिक फ्लॅट फोडून चोरट्यांच्या टोळीने धुमाकुळ घातला असतानाच आता थिबा पॅलेस रोडजवळ ब्लॉक दुसर्या चावीने उघडून आतील रक्कम व दागिने लंपास करण्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता थिबा पॅलेस येथे पुन्हा चोरी झाल्याने चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या रेणुका हिची रात्री कसून चौकशी सुरू होती. रत्नागिरी शहरातील अन्य चोर्यांमध्ये तिचा सहभाग आहे अथवा नाही, याबाबतही शहर पोलीस चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत पुन्हा चोरी
By admin | Updated: May 25, 2014 01:14 IST