शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

पाणी आराखडा तयार

By admin | Updated: February 18, 2015 00:54 IST

राजापूर तालुका: निधीची उपलब्धता होणे आवश्यक

राजापूर : मागील काही वर्षांत वेळेवर पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार न झाल्याने वेळेवर निधी मिळाला नाही आणि टँकरने पाणी पुरवठा करणे महाकठीण ठरले. मात्र, यावर्षी राजापूर पंचायत समिती प्रशासनाने वेळेवर टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३८ गावे व ७८ वाड्यांना ३ कोटी ७५ लाख १० हजार अंदाजीत खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यात ताम्हाणे चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, पळसमकरवाडी, मोरोशी, तळेवाडी, टेंबवाडी, खरवते वाणेवाडी, धनगरवाडी, हसोळतर्फे सौंदळ, कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, विठ्ठलवाडी, कारवली, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, केळवली मोसम, झर्ये धनगरवाडी, जवळेथर धावडेवाडी, मावळतवाडी, ताम्हाणे, चव्हाणवाडी धनगरवाडी, पेड्ये - गुरववाडी, पहिलीवाडी (मधलीवाडी), शेंडेवाडी, कळसवली पळसमकरवाडी, कोष्टेवाडी, गोठणे दोनिवडे, हातणकरवाडी बौद्धवाडी, साखरकरवाडी, गो. दो. शाळा क्र. १ किंजळवणे, नाचणेकर वाडी, नेरकेवाडी क्र. ३, हातणकरवाडी, तांबळवाडी, हुंबरवाडी, हातणकरवाडी कडे कुडकुडवाडी, दळवीवाडी, साखरीनाटे, प्रादेशिक योजना मोरोशी तळेवाडी, टेंबवाडी, आंगले, साळसरकरवाडी, खरवते वाणेवाडी, हसोळतर्फे सांैदळ कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, तळवडे जंगमवाडी, ब्राह्मणदेव धनगरवाडी, कारवली, विठ्ठलवाडी, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, कोंड्येतर्फे राजापूर गाडगीळवाडी महाळुंग धनगरवाडी, पांगरी बुद्रुक बागवाडी, केळवली, कुंभवडे, हरचलीवाडी, मधलीवाडी बौद्धवाडी, रामणवाडी, भरडवाडी, देवाचे गोठणे, सोंड्येवाडी, मयेकरवाडी, कातळीवाडी, धाऊलवल्ली, सोंड्येवाडी, पोकळेवाडी, मधला वठार, रूमडे वठार, पाखाडी, खरवते बौद्धवाडी, दोनिवडे धनगरवडी, तळवडे धनगरवाडी, झर्ये धनगरवाडी, कोदवली धनगरवाडी, मांडवेवाडी, मांडवकरवाडी शाळा नं. २ पाथर्डे धनगरवाडी, धोपेश्वर तिथवली धनगरवाडी, चिखले धनगरवाडी, बारसू धनगरवाडी शाळा, पांगरे बु. गावमळा, धावडेवाडी, मावळतवाडी, मूर चिखलेवाडी, मुरवाळवड करक आंबा, जांभळवाडी, मधलीवाडी, तांबळवाडी, चिखलगाव, ठिकावडी, सुर्वेवाडी, वाटुळ म्हादयेवाडी, गोळवाडी, कोेंड्येतर्फे सौंदळ तांबळवाडी बौद्धवाडी, अजिवली बाणेवाडी बौद्धवाडी, वाडापेठ, धावडेवाडी, प्रिंदावण, तळेखाजण, कणेरे बौद्धवाडी, हातदे पाटीलवाडी, शीळ वरचीवाडी, कोल्हेवाडी असा समावेश असून बहुतांशी वाड्यांमध्ये धनगरवाडे व बौद्धवाड्या यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विंधन विहिरी नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे तात्पुरती पुरक नळयोजना घेणे, खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, टँकरने, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, असा १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ संकलित आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. अखेरच्या टप्प्यात याव्यतिरिक्त संभाव्य गावे व वाड्या या कोणत्या असतील, त्याचा अंदाज घेऊन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. निधीची तरतूद झाल्यास टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पाण्याचे टँकर पोहचू शकतील, याची खबरदारी घेणे प्रशासनावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. (प्रतिनिधी)