लाेकमत न्यूज नेटवर्क
जाकादेवी : पर्यावरणामध्ये होत जाणारे बदल आणि वाढत जाणारे जागतिक तापमान यांचा विचार करून मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पर्यावरण विभागातर्फे नारळ, सुपारी यांच्या रोपांची महाविद्यालयीन परिसरात लागवड करण्यात आली आहे. या झाडांना खाद्यान्न म्हणून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पसुद्धा उभारण्यात आला आहे.
गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या वड, पिंपळ, जांभूळ आदी झाडांच्या संगोपनाबाबत विद्यार्थ्यांचे काम सुरू आहे. विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. गणेश कुळकर्णी, कविता जाधव, पर्यावरण विभागप्रमुख प्रा. श्यामल करंडे यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले, प्राचार्या स्नेहा पालये यांनी केले.