रत्नागिरी : रत्नागिरीतील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या आरे आणि वारे या समुद्रकिनाऱ्यांना जिल्ह्याचे ेपालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भेट देऊन तेथील पर्यटन सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या. किनाऱ्यांच्या संपूर्ण स्वच्छतेबरोबरच गाडीतळाची सोय, पर्यटकांना विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी आदी सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अतुलनीय आहे. येथे सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास परदेशी पर्यटकांसाठीही ते आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परदेशातील समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे, त्याचा उपयोगही या किनाऱ्यांच्या विकासासाठी केला जावा, असेही पालकमंत्री वायकर यावेळी बोलताना म्हणाले. जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, विभागीय वन अधिकारी ए. एन. साबळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरे-वारे विकासासंदर्भात सूचना
By admin | Updated: January 28, 2015 00:54 IST