शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

विकासाचा केंद्रबिंदू धोकादायक

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

इमारती मोडकळीस : २०४ ग्रामपंचायतींचा विकास कधी होणार?

रहिम दलाल -रत्नागिरी ग्रामीण भागातील गावांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारती फार जुन्या असून, त्यांचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १९ लाख २०६१ असून, त्यापैकी १५ लाख ४४१ लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात ८४४ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत़ या योजनांमध्ये पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, यशवंत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामसचिवालय योजना व अन्य योजनांचा समावेश आहे़ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असताना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करुन शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत़ त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे़ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या इमारती २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या आहेत़ या धोकादायक असलेल्या ग्रामपंचायतींच्या इमारतींमधून केवळ ४३ ग्रामपंचायतींना नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. या प्रत्येक ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींसाठी १० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामपंचायत जनसुविधासाठी विशेष अनुदानातून २३ ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनमधून २० ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत.धोकादायक असलेल्या या ग्रामपंचायतींच्या इमारतीचे छत मोडकळीस आले असून, काही इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत़ ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये कर्मचारी व लोकप्रतिनिधी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्र भिजल्याने जुनी कागदपत्र खराब होत आहेत़ त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे़एकीकडे गावच्या विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़भाड्याच्या जागेत इमारतीजिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ८३६ ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीची कार्यालये आहेत. उर्वरित ८ ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामध्ये खेडमधील ४, चिपळुणातील २ आणि खेड व लांजातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ या ग्रामपंचायती भाड्याच्या जागेत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणाऱ्या ग्रामपंचायतींच्या इमारती डळमळीत झालेल्या असतानाही त्यांना पुरेसा निधी नाही. त्यामुळे त्यांची कामे टप्प्याने घेण्यात येत आहेत. धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शासन त्यांच्या बांधकामासाठी पुरेसा निधी कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राजीव गांधी भवन या योजनेतून ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींसाठी १२ लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यातून २ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींची कामे घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेतून ११ ग्रामपंचायतींना नवीन इमारती देण्यात येत असून, आणखी १३ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत.तालुका ग्रामपंचायत इमारतीमंडणगड१२दापोली४५खेड२१चिपळूण२४गुहागर१४संगमेश्वर१३रत्नागिरी२०लांजा१०राजापूर१२एकूण१७१