शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गतिमान प्रशासन; पारदर्शी कारभारासाठी ‘ई आॅफीस’

By admin | Updated: May 18, 2016 00:29 IST

प्रदीप पी. यांची माहिती : फोन इन कार्यक्रमही लवकरच राबवणार

रत्नागिरी : नंदूरबार येथे जिल्हाधिकारी असताना ई - आॅफीस ही संकल्पना अगदी तहसीलस्तरावर राबविली होती. प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान आणि पारदर्शी व्हावा, यासाठी इथेही लवकरात लवकर ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी आज आयोजित केलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर पुढच्या लोकशाही दिनापासून ‘फोन इन’ कार्यक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खरीप हंगाम २०१६ पीक कर्ज वाटप अभियानासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रदीप पी. यांनी आज सायंकाळी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शेख आदी उपस्थित होते. राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, सहकारी बँकांमार्फत खरीप पीक कर्जवाटप करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जे शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित आहेत, अशांना एक लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रदीप यांनी सांगितले.गतवर्षी जिल्ह्यातील १ लाख ८ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता. यावर्षी खरीप पीक कर्ज वाटप अभियानाच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे. अभियानाच्या अनुषंगाने वेळापत्रकही तयार करण्यात आले असून, आज जिल्हास्तरीय बैठकीने अंमलबजावणीला प्रारंभ झाला असल्याचे प्रदीप पी. यांनी सांगितले. तसेच या अभियानाची कार्यपद्धती त्यांनी सविस्तर विशद केली.यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी क्षेत्रिय कर्मचारी म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी या अभियानासंदर्भात क्षेत्रिय कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करून त्यांना माहिती देण्यात येणार आहे. तसेच येत्या १० जूनपर्यंत कर्ज वाटप करण्याच्या सूचना बँकांना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.जिल्हा प्रशासनाचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच फाईल पेंडिंगचे प्रमाण थांबावे, यासाठी नंदूरबारप्रमाणेच येथेही लवकरच ई आॅफीस संकल्पना राबवण्यात येणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांना थेट तक्रारी मांडता याव्यात, यासाठी पुढील लोकशाही दिनापासून ‘फोन इन’ ही संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्हा टँकरमुक्त करण्याचा प्रयत्नजिल्ह्यात सध्या दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील वर्षी जिल्ह्यात एकही टँकर धावण्याची गरज भासणार नाही, असा प्रयत्न राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच कुठल्या भागात तीव्र पाणीटंचाई असेल आणि त्याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यास शासकीय टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे ते म्हणाले. अवैध उत्खननावर बडगाजिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी कार्यभार हाती घेताच म्हाप्रळ येथील अवैध वाळू उत्खननावर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी त्यांनी १० संक्शन पंप सील केले. त्यांच्यावर कारवाई करत ३० ते ४० लाखांचा दंड वसूल करण्यात आला. याबाबत माहिती देताना प्रदीप पी. यांनी यापुढेही जिल्ह्यात अवैध उत्खननावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगून आज झालेल्या प्रांत व तहसीलदारांच्या बैठकीत सक्त कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. हातपाटी परवानाधारकांचेही परवाने तपासण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.