चिपळूण : राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाच्या समितीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार्या कोयना व चांदोली अभयारण्यांची पाहणी केली. सह्याद्रीच्या खोर्यात वन व प्राणी संवर्धनासाठी केलेल्या उपायोजनांची माहिती या पाहणी दरम्यान घेण्यात आली. आंध्रप्रदेशचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक कुमार, वाईल्ड इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. ओनिवाल यांचा या पथकात समावेश होता. त्यांच्यासोबत मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, वन्यजीव अधिकारी पंडितराव, उपअधिकारी सत्यजीत गुरव होते. देशातील अन्य व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कोयना व चांदोली प्रकल्पांची भौगोलिक रचना वेगळी आहे. चांदोली, कोयना प्रकल्प चढ-उतार, खोल दर्या, डोंगर व दाट झाडीत आहे. हद्दही मोठी आहे. वाघ, बिबट्या किंवा अन्य वन्यजीवांवर सहज लक्ष ठेवणे या परिस्थितीत अडचणीचे आहे. त्यामुळे या प्रकल्पातील अधिकारी व कर्मचार्यांवर जबाबदारी फार मोठी असल्याचे मत समितीने व्यक्त केले. कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समितीने परिसरातील शेतकर्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील गावांची पाहणी केंद्रीय समितीने केल्यामुळे आता प्रकल्पाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सह्याद्रीच्या खोर्यात वन व प्राणी संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन या समितीने योग्य त्या सूचना दिल्या. देशातील अन्य व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत सह्याद्री प्रकल्पाची स्थिती वेगळी असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
व्याघ्र प्रकल्प समितीची कोयना, चांदोलीत पाहणी
By admin | Updated: May 21, 2014 17:37 IST