शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोटिंग प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करतोय

By admin | Updated: September 5, 2014 23:31 IST

जलपर्यटन : मोडकाआगर धरणाने घेतले रोजगार निर्मितीचे नवे रूप

असगोली : अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये असणारा बोटिंग प्रकल्प पर्यटकांसाठी पर्वणी ठरला आहे. पावसाळ्यातदेखील या बोटिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहे. या बोटिंग प्रकल्पामुळे गुहागरचा आर्थिक विकास होणार आहे. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या धरणामध्ये बोटिंग प्रकल्पाने पर्यटनामध्ये आपले यशस्वी नाव कोरले आहे. येथे आणखी सोयीसुविधा शासनाने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी पर्यटकांमधून व्यक्त होत आहे. २००६ साली दुर्लक्षित असलेल्या मोडका आगर धरणामध्ये गुहागर पर्यटन विकास संस्थेच्या उज्ज्वला रहाटे यांनी धाडसाने बोटिंग प्रकल्प सुरु केला. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या धरणाला बोटिंग प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळाली. येथे मुंबई - पुणे तसेच परदेशी पर्यटकांची ये-जा सुरु झाली. तालुका व जिल्ह्यातील पर्यटनप्रेमी आपल्या कुटुंबासमवेत निसर्गाच्या सौंदर्याची मजा लुटण्याबरोबर जल पर्यटनाची मजा घेऊ लागले.गुहागर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत व समुद्र किनारी वसलेल्या अतिशय सुंदर गावाला देखणा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावर मिळणारे शंखशिंपले, समुद्रस्थान, डोलणाऱ्या नारळी - पोफळीच्या बागा, पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिरे, शिवरायांचा गोपाळगड अशा अनेक गोष्टी मनाला भुरळ पाडणाऱ्या आहेत. त्यामुळे बोटिंग प्रकल्पामुळे आणखीनच भर पडली आहे. परंतु तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अजूनही येथे काही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामध्ये धरणावरील असलेल्या बेटावर जंगल सफर, रॅपलिंग, निसर्गाेपचार केंद्र, लेक क्रॉसिंग प्रदूषणविरहीत साहसी व करमणूक खेळांचा नियोजनबद्ध विकास, सुसज्ज गार्डन, अल्पोपाहार आदी महत्त्वाच्या गोष्टींमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या तेथे लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळांचे साहित्य उपलब्ध आहे. त्याचा आनंद लहान मुले घेताना दिसत आहेत.ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गुहागर तालुक्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. यामुळे वर्षभर पर्यटकांची मांदियाळी असते. गुहागरात जल पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन करणे महत्त्वाचे असून, या उपक्रमांमुळे अधिक पर्यटक गुहागरला येतील. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)