- हुसेन मेमन, जव्हारदि जव्हार अर्बन को. आॅप. बँकेच्या निवडणुकीत शिवनेरी पॅनलने बाजी मारत १७च्या १७ जागांवर विजय मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, वाडा, कुडूस, मनोर येथून एकत्रित केलेल्या एकूण ४७२७ मतांची मतमोजणी होऊन सर्वसाधारण गटातून एकूण बारा उमेदवार तर राखीव गटातून एकूण ५ उमेदवार असे यश शिवनेरी पॅनलच्या उमेदवारांना मिळालेले आहे. त्यामुळे सर्वत्र शिवनेरीचा बोलबाला आहे.पूर्वी ही निवडणूक तालुका नुसार राखीव होती, जव्हार, मोखाडा व खोडाळा मिळून जव्हार व मोखाडा तालुक्याकरीता मतदान करत होते, तर विक्रमगड, वाडा व कुडूस मिळून विक्रमगड तालुक्याकरीता मतदान करीत होते आणि मनोर करीता मनोर, पालघर, बोईसर इ. मिळून मतदान करीत होते, त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या मतदारांना प्रत्येक उमेदवारांची ओळख होती, परंतू प्रथमच सर्व तालुके मिळूनएकत्रित निवडणूक करण्यात आल्याने काही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा परिणाम या निवडणूकीवर सहकार पॅनलच्या उमेदवारांना बघावयास मिळाला. या बँकेच्या निवडणुकीत शिवनेरी पॅनलने एक प्रकारे इतिहासच घडवला आहे.मतमोजणी करताना उमेदवार - पोलिसांत बाचाबाचीपोलिस उपनिरीक्षक शेलार हे मतमोजणी सुरू असताना ज्या प्रतिनिधी व उमेदवाराकडे बिल्ला नसेल त्याला बाहेर काढण्याचे काम दुपारी करीत होते. परंतु, विक्रमगडचे उमेदवार मनोज भानूशाली यांनी बिल्ला न लावल्यामुळे त्यांनाही बाहेर जा असे सांगितले, त्यावर भानूशाली यांनी मी उमेदवार आहे असे सांगितले, तरीही शेलार यांनी बिल्ला नाही तुम्ही बाहेर जा असे ओरडून हाताला पकडून बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आपला रूबाब दाखवला, त्यावेळी शिवनेरी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी केंद्रात गदारोळ केला, परंतु काही लोकांनी मध्यस्थी करीत आपआपसात मिटवून मतमोजणी प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू केली. पोलिसांच्या मनमानीमुळे कार्यकर्ते नाराज झाले होते.
जव्हार अर्बन बँकेवर शिवनेरीचा झेंडा
By admin | Updated: July 30, 2015 23:02 IST