शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: May 16, 2017 00:01 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करणारे

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करणारे आणि विकणारे यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन, बिल पोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी यांनाही या सर्व्हरचा फटका बसला आहे.सोमवारी सरकारच्या सर्व्हरने काही अंशी वेग पकडल्याने व्यवहारांना संथ गतीने सुरुवात झाली. मेसर्स टाटा कम्युनिकेशन यांच्या डाटा सेंटरमध्ये नवीन पायाभूत सुविधांसह अन्यबाबींची प्रतिष्ठापना करण्यासाठी ‘डाऊन टाईम’ घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ६ मे २०१७ सायंकाळी सहा वाजल्यापासून ते ११ मे २०१७ सकाळी दहा वाजेपर्यंत तर, दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार १२ मे २०१७ सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रविवार १४ मे २०१७ सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘वेळ’ घेण्यात आला होता. त्याबाबतचे एक परिपत्रकच ३ मे २०१७ रोजी सरकारने काढले होते. सर्व्हर बंद असल्याने बिम्स प्रणालीद्वारे प्राधिकारपत्र काढणे, ग्रास प्रणालीद्वारे सरकारी खाती जमा करणे, सेवार्थ प्रणालीद्वारे देयके तयार करणे, निवृत्तिवेतन प्रकरणे तयार करणे, बिल पोर्टलद्वारे देयके तयार करणे, अतितातडीच्या सेवा वगळता कोषागारात देयके सादर करणे अशा सेवांना ब्रेक लागला होता.पनवेल, उरण, खालापूर, पेण आणि अलिबाग तालुक्यात मोठ्या संख्येने विकासकात्मक योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार, जमीन, दुकान, घर, फ्लॅट भाड्याने देणे यांचा समावेश होतो. या व्यवहारांचा थेट संबंध हा सह जिल्हा निबंधक व मुद्रांक अधिकारी कार्यालयाशी येतो. मात्र सर्व्हरचे अपग्रेडेशनचे काम सुरू होते. त्यामुळे विविध प्रकारची सुमारे ७० प्रकरणांची दस्तनोंदणी रखडली होती. या दस्तनोंदणीचा आर्थिक व्यवहार हा कोट्यवधी रुपयांच्या घरातील आहे. त्यामुळे खरेदी-विक्री करणारे दोघेही अडचणीत आले होते. काहींना फ्लॅटचा ताबाही घेता आला नसल्याची चर्चा कार्यालय परिसरात होत होती.