शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

ग्रामीण भागातील मुलींना मिळाली भाऊबीज

By admin | Updated: November 14, 2015 02:18 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना शालेय शिक्षण मोफत असले तरी त्यांचे शालेय साहित्य, गणवेश, शालेय सहलीची वर्गणी याकरिता ग्रामीण

जयंत धुळप,  अलिबागजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना शालेय शिक्षण मोफत असले तरी त्यांचे शालेय साहित्य, गणवेश, शालेय सहलीची वर्गणी याकरिता ग्रामीण भागातील मुलींना त्यांच्या पालकांकडून पैसे उपलब्ध होत नाहीत. परिणामी या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास वा माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या मुलींना वर्गातील इतर मुलींप्रमाणे शाळेतील आनंद उपभोगता येत नाही. या समस्येचा अत्यंत संवेदनशीलतेने अभ्यास करु न महाडमधील सावली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉ.अर्चना जैन यांनी गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या या ग्रामीण शाळांमधील छोट्या बहिणींना भाऊबीजेची आगळी भेट दिली. शासनाकडून अशा आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलींकरिता सावित्रीबाई फुले शैक्षणिक दत्तक पालक योजना राबविली जाते. या योजनेनुसार ३६५ रुपये एका मुली करिता त्यांच्या पालकांनी भरले की शासन तितकीच म्हणजे ३६५ रुपये रक्कम त्यात जमा करुन एकूण ७३० रुपये एका मुलीस उपलब्ध केले जातात. यातून मग त्या मुलीचा शालेय साहित्य, गणवेश, शालेय सहलीची वर्गणी यांचा खर्च भागवला जावून अन्य मुलींप्रमाणेच त्यांनाही शिक्षण आणि शैक्षणिक आनंद घेता येतो. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या या मुलींच्या पालकांना हे ३६५ रुपये देखील भरता येत नसल्याने या मुलींना अपेक्षित सुविधा आणि आनंदास मुकावे लागत होते. यासाठी जैन दाम्पत्याने या मुलींना आर्थिक मदत करुन या मुलींच्या आयुष्यात आनंद फुलवण्याकरिता एक नामी शक्कल लढवली. सर्व प्रथम गणराज जैन व त्यांच्या पत्नी डॉ.अर्चना जैन यांनी स्वत: महाड तालुक्यांतील नडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही मुलींचे सावित्रीबाई फुले शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत प्रत्येकी ३६५ रुपये त्यांची दिवाळीची वार्षिक पालकत्वाची भाऊबीज म्हणून भरुन त्यांना शासनाचे ३६५ रुपये मिळवून देवून त्या प्रत्येक मुलीस ७३० रुपये मिळवून दिले आणि स्वत: भाऊ या नात्याने त्यांनी त्या मुलींचे पालकत्व स्वीकारले. हा आनंद अधिकाधिक मुलींना मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या परिचितांना या याबाबत माहिती देऊन अशा मुलींचे शैक्षणिक पालक बनण्याकरिता व्यक्तिगत पातळीवर आवाहन केले.२०११ मध्ये ६० मुलींचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतर २०१२ मध्ये १२,२०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ४० तर या वर्षी २०१५ मध्ये ६४ मुलींचे या ३६५ रुपयांच्या भाऊबीजेच्या रुपातून गेल्या पाच वर्षांत १९१ मुलींना पालकत्वाची भाऊबीज प्राप्त होवू शकली आहे.