म्हसळा : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून तालुक्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी १ जुलै रोजी वृक्ष लागवड करून या विधायक उपक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती नाजिम हसवारे यांनी के ले.तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा कन्या शाळा म्हसळा येथे सभापती नाजिम हसवारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी हसवारे बोलत होते. शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यास कटिबध्द असल्याचे हसवारे यांनी सांगितले. तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी अंगणवाडीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे आवाहन करून सर्व शिक्षकांनी यासाठी सहकार्य करून लवकरात लवकर तालुक्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच वनमंत्र्यांनी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लावण्याचे आवाहन केले आहे, त्यासाठी तालुक्यातील सर्व शाळा व शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी गटविकास अधिकारी नीलम गाडे आदी उपस्थित होते.
वृक्ष लागवड करणे अत्यावश्यक
By admin | Updated: June 25, 2016 01:56 IST