शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण घटले

By admin | Updated: April 23, 2017 03:55 IST

आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला कर्जत तालुका २०१६ मध्ये सरकारी पातळीवर कुपोषणामुळे चर्चेत आला. आॅगस्ट २०१६ मध्ये येथील कुपोषणाने द्विशतक गाठले

- संजय गायकवाड,  कर्जतआदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला कर्जत तालुका २०१६ मध्ये सरकारी पातळीवर कुपोषणामुळे चर्चेत आला. आॅगस्ट २०१६ मध्ये येथील कुपोषणाने द्विशतक गाठले होते. आठ महिने जिल्हास्तरावरून अंगणवाडीपर्यंत सर्व पातळीवर प्रयत्न झाल्याने आता कर्जत तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. आता १२ अतितीव्र आणि ६६ तीव्र कुपोषित बालके निरीक्षणाखाली आहेत. महिला बालविकास आणि आरोग्य विभागाबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने तालुक्यातील कुपोषण १०० ने खाली आले आहे.गतवर्षी रेल्वे मार्गाच्या आसपास असलेल्या गावात तालुक्यातील निम्मे कुपोषणग्रस्त बालके आढळल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. आॅगस्ट २०१६ मध्ये कर्जत तालुक्यात अतितीव्र कुपोषित ४५ आणि तीव्र कुपोषित १३६ अशी १८९ बालके आढळून आल्याने महिला बालविकास विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तालुक्यातील दोन विभागात ३३५ अंगणवाड्या असताना तेथे कायमस्वरूपी नियुक्त केलेले प्रकल्प अधिकारी हे पद तीन वर्षांपासून रिक्त होते. कळंब, नेरळ, खांडस या विभागाचा मिळून एक आणि मोहिली, कडाव, आंबिवली या विभागांचा दुसरा प्रकल्प कर्जत तालुक्यात राबविण्यात आला आहेत. दर दोन महिन्यांनी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यातील कुपोषित बालकांची पाहणी करून त्यांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम समन्वयातून केले जाते. मात्र तालुक्यात १८९ कुपोषित बालके आढळल्याने केंद्र सरकारची डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना तालुक्यातील ४७ अंगणवाड्यात सुरू करण्यात आली. त्यानंतरही कुपोषण कमी होत नसल्याने जिल्ह्यात बंद असलेले राज्य सरकारचे अनुदान सुरू करण्यात आले. जिल्ह्यासाठी ७५ लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या निधीमधून कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये अंगणवाड्यात ग्राम बालसुधार केंद्र सुरू करण्यात आली. गाव पातळीवर कुपोषित बालकांवर अधिक पोषण आहाराचा प्रयत्न करूनदेखील कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नव्हते. काही सामाजिक आणि स्वयंसेवी संघटना पुढे येऊन देखील कुपोषण कमी होत नसल्याने अखेर कर्जत तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्यातून निघालेल्या निष्कर्षातून कर्जत तालुक्यात उपजिल्हा रु ग्णालय आणि कशेळे ग्रामीण रु ग्णालय येथे कुपोषित बालकांना दाखल करून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अति आणि तीव्र कुपोषित बालकांना दाखल करून २१ दिवसांचे निवासी शिबिर सुरू करण्यात आले. डिसेंबर महिन्यात कर्जतबरोबरच कशेळे ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करून कुपोषित बालकांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले गेले. त्या बालकांबरोबर त्यांच्या पालकांना निवासी ठेवण्यात आले, शिवाय त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली. आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे कर्जत तालुक्यातील कुपोषण निम्म्याहून अधिक कमी झाले आहे. - कर्जत तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांत मिळून १२ अतितीव्र कुपोषित बालके असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या दोन्ही ठिकाणी मिळून ६६ इतकी आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे तब्बल १०० बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. सामूहिक प्रयत्न केल्याने कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी झाले आहे. तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी सरकारी योजनांबरोबरच सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. - सुरेश लाड, आमदार