शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

म्हसळा येथे सर्वाधिक पाऊस

By admin | Updated: June 25, 2016 01:54 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी पावसाने बरसून गेल्या १५ दिवसांचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या दमदार आगमनाने मात्र शेतीच्या कामांना सुरुवात झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाला सातत्याने बगल देत मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल, असे वाटत होते मात्र त्याने हुलकावणी दिल्याने मान्सूनचे आगमन तब्बल २० दिवस लांबले. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्या करपण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला होता. त्याचप्रमाणे वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याने नागरिकही प्रचंड हैराण झाले होते.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही मोठ्या संख्येने सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता आता त्यानिमित्ताने दूर झाल्याचे दिसून येते. गेल्या २४ तासात सरासरी ६२.७१ मिमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे नद्या, नाले छोटी-मोठी धरणे, विहिरींमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या ठिकाणी काही अंशी समाधानाची स्थिती निर्माण होण्यास मदत मिळत असल्याचे चित्र आहे. पावसाच्या कालावधीत एमएसईडीमार्फत होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये सातत्याने अडथळे येत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. (प्रतिनिधी)अलिबाग: शुक्र वारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण १००३.४६मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ६२.७१ मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकूण पाऊस १८६५.४० मिमी होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ११६.५९ मिमी होते. यंदाचा पाऊस गतवर्षीच्या सरासरी प्रमाणास अद्याप पोहोचू शकलेला नाही.गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी, मुरुड ८७ मिमी, रोहे ८५ मिमी, माणगाव ७३ मिमी, महाड ७२ मिमी, पोलादपूर ५५ मिमी, उरण ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.रोह्यात पावसाचे पुनरागमनरोहा : वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर रोहा तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले होते. परंतु त्या नंतर तीन दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग काहीसा चिंतेत आला होता. परंतु संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसाने तालुक्यात पुनरागमन केल्याने बळीराजा सुखावला असून शेतकऱ्यांनी चिखलणी,तसेच राबांना खत मारणे ही कामे सुरू केली आहेत. मत्स्यप्रेमी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास वळगणीचे मासे खाण्यास मिळतील अशी मासेप्रेमींची अपेक्षा आहे.