पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:23 IST2026-01-02T18:22:53+5:302026-01-02T18:23:57+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीच्या सात उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाला मतदानाआधीच चांगले यश मिळाले आहे.

पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप-महाविकास आघाडीला उमेदवारांनीच झटका दिला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२ जानेवारी) तब्बल सात उमेदवारांनी माघार घेतली. दुसरीकडे भाजपाची विजयी घोडदौड सुरूच आहे. भाजपाचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये शुक्रवारी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या तब्बल सात उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याची आता औपचारिक घोषणाच बाकी आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, उद्धवसेना, काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत.
भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
१) नितीन पाटील
२) रुचिता लोंढे
३) अजय बहिरा
४) दर्शना भोईर
५) प्रियंका कांडपिळे
६) ममता म्हात्रे
७) स्नेहल ढमाले