दासगाव : महाड तालुक्यातील गांधारपाले या गावात राहणारी व्यक्ती मुलगा काही काम करत नाही म्हणून मुलाला रागावली. या गोष्टीचा राग मनात धरून मुलाने शुक्रवारी राहत्या घरी कोयता वडिलांच्या डोक्यात घालून जखमी के ले. तसेच शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाड शहरानजीक असलेल्या गांधारपाले या गावातील राहणारे मोहन चव्हाण (५२) यांनी आपला मुलगा मुकेश चव्हाण (२६) काही काम करत नाही, घरी बसून असतो म्हणून बडबड केली. याचा मनात राग धरून मुकेशने शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या डोक्यात कोयत्याने वार करत शिवीगाळ केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देत पळून गेला. मोहन चव्हाण यांना डोक्याला व हाताला दुखापत झाली असून ते महाड ट्रॉमा केअरमध्ये उपचार घेत आहेत. महाड शहर पोलिसांनी कोयता जप्त केलाअसून मुकेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय थवई करत आहेत. आरोपीस अद्याप अटक नाही. (वार्ताहर)
मुलाचा वडिलांवर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 01:58 IST