शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

‘झीरो गारबेज’ कागदावरच

By admin | Updated: August 12, 2014 03:42 IST

केंद्र शासनाने ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा कायदा केला आहे. महापालिकेने कायद्याची कडक अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित आहे.

हणमंत पाटील, पुणेकेंद्र शासनाने ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा कायदा केला आहे. महापालिकेने कायद्याची कडक अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु, महापालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे कायद्याच्या कडक अंमलबावणीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष आहे. त्यामुळे महापालिकेने वाजतगाजत सुरू केलेला ‘कचरामुक्त प्रभाग’ (झीरो गारबेज) हा संकल्प कागदावरच राहिला आहे. गेल्या २३ वर्षांपासून महापालिकेला कचऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर प्रत्येक वर्षी टनाने कचरानिर्मिती वाढत आहे. सद्यस्थितीत रोज सुमारे १७०० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी तब्बल ८० टक्के कचरा पूर्व भागातील हडपसर, उरुळी देवाची व फुरसुंगी या गावातील कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी पाठविला जातो. मात्र, त्याठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात पाणी प्रदूषण व रोगराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून वारंवार कचरा आंदोलन केले जाते. मात्र, आंदोलन सुरू झाल्यानंतरच महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना कचऱ्यावरील उपायोजनांची आठवण होते. प्रत्येक वेळी कचरासमस्या सोडविण्यासाठी तारीख पे तारीख आणि आश्वासने दिली जातात. अन् पुन्हा त्याचा सोयीस्कर विसर माननीयांना पडतो. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कचरा आंदोलनाला धार आला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी मंडळी खडबडून जागी झाली आहेत. परंतु, माननीयांनी तीन वर्षांपूर्वी प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्याची आणि ‘प्रभाग कचरा व कंटनेरमुक्त’ करण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महापालिकेचा घनकचरा विभाग, जनवाणी व स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्प्यात २० प्रभाग कचरामुक्त करण्याचा निर्णय झाला. परंतु, शहरातील ७६ प्रभागांपैकी केवळ ९ प्रभागांनी ही संकल्पना राबविण्याची तयारी दाखविली. काही प्रभागांचे अपवाद वगळता स्थानिक नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे झीरो गारबेज योजनेची अंमलबजावणी धीम्या गतीने सुरू आहे. केंद्राच्या कचरा वर्गीकरण कायद्यानुसार ओला व सुका कचरा वेगळा करून देणे नागरिकांवर बंधनकारक आहे. वर्गीकरण न केल्यास नागरिक अथवा सोसायटीच्या संचालक मंडळावर खटला दाखल करून शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु, पालिकेतील अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केवळ नोटीस देण्याचे सोपस्कर पार पाडत आहे. परंतु, ‘ओला व सुका कचरा वेगळा’ करून प्रभागात जिरविण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.