वडवळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील मुस्लीम भक्त महंमद तांबोळी गेल्या 27 वर्षापासून येथील सार्वजनिक नवरात्रोत्सवातील देवीची आराधना करीत आहेत. विशेष म्हणजे ते नागनाथ भक्त आहेत. ते दरवर्षी येथील स्थानिक देवीला अर्धा ग्रॅम सोने अर्पण करतात व देवीभक्तांना फराळाचे वाटप करतात.
महंमद तांबोळी यांचे नागनाथ मंदिराच्या मार्गावरच खेळणी, सरबत विकण्याचे छोटेसे दुकान आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. हिंदू भाविकांप्रमाणोनवरात्रोत्सवाच्या कालावधीत ते जमिनीवर झोपतात. माङया बहिणीची मुलगी यास्नी दहा वर्षाची असताना खूप आजारी पडली होती. माङया बहिणीने देवीकडे तिचा आजार बरा होण्यासाठी प्रार्थना केली. त्यास यश आल्यानंतर मी भक्तीभावाने आराधना सुरू केली असे ते सांगतात. (प्रतिनिधी)