शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

पळसनाथाच्या शिल्पसौंदर्याचे जतन होणार का?

By admin | Updated: May 23, 2016 01:55 IST

उजनी जलाशयात गडप झालेल्या पळसनाथ मंदिराचा पुरातनकालीन ठेवा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. उजनी जलाशयात पाणी आल्यावर मंदिराचे अस्तित्व पुसले जाते

रविकिरण सासवडे,  बारामतीउजनी जलाशयात गडप झालेल्या पळसनाथ मंदिराचा पुरातनकालीन ठेवा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. उजनी जलाशयात पाणी आल्यावर मंदिराचे अस्तित्व पुसले जाते. वर्षातील १२ महिने हे मंदिर पाण्याखाली असते. तीव्र दुष्काळाच्या काळातच मंदिर पाहावयास मिळते. पाण्याखाली राहूनदेखील मंदिराची वास्तू उजनीच्या लाटांना तोंड देत भक्कमपणे उभी आहे. हा पुरातन कालीन ठेवा जतन होणार का? असा सवाल येथे भेट देणाऱ्या शिल्पप्रेमी पर्यटकांसह, इतिहास संशोधकांमधून विचारला जात आहे. १९७८ साली उजनी जलाशय पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर कायमस्वरूपी पाण्याखाली गेले. तसेच पळसदेव हे गावदेखील पाण्याखाली गेले. मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर नवीन वसलेल्या गावात पळसनाथाचे मंदिर बांधण्यात आले. धरणात बुडालेल्या मंदिरातील शिवलिंग या नवीन मंदिरात स्थापन करण्यात आले. त्यामुळे येथील देव वाचला, पण देवाचे घर कायमस्वरूपीच पाण्यात बुडाले. अप्रतिम कलाकुसर असणारे पळसनाथाचे हे मंदिर यादवकालीन हेमाडपंती प्रकारातील आहे. मंदिराचे शिखर, गाभारा, सभामंडप, खांब आजही सुस्थितीत आहेत. सभामंडपाच्या खांबांवरील साखळीचे कोरीवकाम थक्क करणारे आहे. सभामंडपाच्या बाहेरील भिंतीवरील कोरीव नक्षीकामही अप्रतिम आहे. मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणात तर शिखर चपट्या भाजक्या विटांमध्ये बांधलेले आहे. शिखराच्या एकदम अग्रभागी असणारे सहस्र कमळदेखील आपले सौंदर्य ताठ मानेने दाखवत उभे आहे. मंदिराच्या आवारामध्ये ओवऱ्या, सतीशिळा, चारी बाजूंनी कोरलेल्या विरगळ, भग्न झालेली मारुतीची सुमारे ५ फूट उंच मूर्ती, भंगलेला नंदी व त्यावर एक बसलेली मानवाकृती, मंदिराच्या पाठीमागील बाजूस भग्न झालेली शंकर पार्वतीची मूर्ती, तर तटबंदीला असणारे ढासळलेले प्रवेशद्वारही दिसते. - आणखी छायाचित्रे/८मुख्य मंदिराच्या शेजारीच आणखी एक हेमाडपंती मंदिर उभे आहे. येथील स्थानिक नाविक पोपट नगरे यांनी हे बळीश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले. या मंदिराची अवस्था मात्र वाईट झाली आहे. मंदिराच्या मोठमोठ्या शिळा ढासळलेल्या आहेत तर काही ढासळण्याच्या स्थितीत आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूस ‘आॅरगन’सारखी रचना असणाऱ्या कोरीव शिळा आहेत. या शिळा वाजवल्यास त्यामधून सात प्रकारचे स्वर ऐकू येतात. थक्क करणारी ही वास्तुरचना आणि त्यामागील शास्त्र यांना सलाम करावासा वाटतो. सभामंडपाच्या एका खांबावर प्राचीन शिलालेख आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार ठरलेल्या वास्तू आहेत. या वास्तू इतिहासाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या आहेत. मात्र, या ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, किल्ले, वाडे दुर्लक्षित राहिल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.....मंदिर यंदाच्या दुष्काळात संपूर्ण उघडे पडले आणि आपसुकच इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटकांची पावले पळसदेवकडे वळली. येथे येणारा प्रत्येक जण ही नखशिखांत सौंदर्याने नटलेली मंदिरे पाहून हळहळ व्यक्त करत आहे. येथील स्थानिक पोपट नगरे यांच्यासारखे नाविक डोळ्यात पाणी अणून ‘साहेब, ही मंदिरे वाचतील का हो’ म्हणून विचारणा करतात.