शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

By admin | Updated: July 28, 2016 03:53 IST

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात

- नीलेश काण्णव,  घोडेगावमाळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात व या जुन्या आठवणींनी ते गहिवरतात... ग्रामस्थांना हक्काचे घर देण्यासाठी सध्या नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे... घडलेल्या घटनेचा व घटनेनंतर घडलेल्या घडामोंडीचा आढावा ‘लोकमत’ आजपासून घेत आहे.आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही... चोर-पोलीस खेळताना पायाखाली घातलेले गाव आठवते आणि आज त्याच रस्त्याने रोज घरी जाताना सगळा मातीचा ढिगारा दिसतो... मित्रांची घरं दिसत नाहीत.‘लोकमत’ने माळीण घटनेला ३0 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने गावात जाऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांना आठवणी सांगताना गहिवरून आले.झरझरा आला वारा, टपटप पडला पाऊस सारा, ढडम ढडम ढगांचा आवाज, कोकिळा म्हणते पाऊस आला.. पावसा पावसा ये रे.. पीक पाणी खूप रे! अशी गाणी आम्ही भेट दिली असता हे विद्यार्थी गुणगुणत होते. दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांना अजूनही जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळ खेळत असलेले गावातील सवंगडी आठवतात. माळीण येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून, येथे एकूण ७१ मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत अडिवरे, पंचाळे, वचपे, आमडे व माळीणमधील मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्ये प्रतीक राजेंद्र झांजरे, ऋतीक जालिंदर झांजरे, मनाली गणेश झांजरे, रोनित गणेश झांजरे, रोशन जालिंदर झांजरे, प्रतीक सुनील झांजरे, केतन सुनील झांजरे, अनुष्का दगडू झांजरे ही दुर्घटनेतून बचावलेली आठ मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मागची काही झांजरेंची घरे बचावली व पोटे, लेंभे, विरणक यांची घरे गाडली गेली; त्यामुळे सध्या शाळेत झांजरेंची मुले जास्त आहेत. या मुलांशी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालवाडीच्या कुसुमबाई आणि तान्हूबाई खूप आवडायच्या. त्या आम्हाला खाऊ करून द्यायच्या...हे मुलं आजही सांगत आहेत. चिंचेचीवाडीमध्ये राहणाऱ्या दीपाली विजय लेंभे या मुलीला मानसी, पूजा, प्रियंका या मैत्रिणी आठवल्या. त्यांच्या बरोबर जुन्या गावातील मारुती मंदिरासमोर आम्ही खूप खेळायचो. मानसीचं घर खूप आवडायचं आणि आता रोज त्याच रस्त्याने घरी जाताना सगळा मातीचा ढिगाराच दिसतो. आम्ही खेळायचो ते मारुतीचे मंदिर दिसत नाही, आणि माझ्या मैत्रिणीचं घरंबी तिथं नाही.’- गावातील यात्रा व बैलपोळ्याच्या आठवणी मुलांनी सांगितल्या. ‘यात्रेत आम्ही खूप मजा करायचो, फुगे,गाड्या, खेळणी घ्यायचो. दिवसभर यात्रेत फिरायचो. लय मजा यायची. ‘बैलपोळ्याला बैल सजवायचो, मंदिरासमोर मिरवणूक काढायचो. खूप नाचायचो... - अविनाश सखाराम लेंभे या मुलाचे मयूर संजय पोटे आणि संतोष दिलीप लेंभे हे मित्र होते. यांच्या खप्ूा साऱ्या आठवणी त्याने सांगितल्या. ‘गावातील आख्खी पोरं चोर-पोलीस खेळायचो. - तेव्हा पूर्ण गावातून आम्ही फिरायचो, लय मजा यायची. खेळून झाल्यावर मग संतोषच्या घरी जाऊन जेवण करायचो...हे सांगत असतानाच अविनाश गप्प होऊन गहिवरला.मुले गप्प झाली : प्रतीक सुनील झांजरे, रोशन जालिंदर झांजरे या मुलांची घरे शाळेच्या मागे असल्यामुळे वाचली. पण, त्यांना आजही जुन्या गावातील चिंचेच्या झाडाखाली मुलं खेळताना आठवतात. ते म्हणाले, ‘सोहम झांजरे, सागर पोटे या मित्रांबरोबर मंदिरासमोर बॅटबॉल खेळायचो. कबड्डी, लपाछपी खेळायचो पण आता आम्ही तेथे खेळायला जात नाही. कारण, आमचे मित्र बी नाहीत आणी गाव बी राहिला नाही, असे सांगत ही मुले गप्प झाली.