शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पाणीकपात रखडली

By admin | Updated: September 2, 2015 04:26 IST

धरणक्षेत्रामध्ये खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करून एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे

पुणे : धरणक्षेत्रामध्ये खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करून एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र महापौर दत्तात्रय धनकवडे हे परदेश दौऱ्यावर असल्याने ते परत आल्यानंतरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर होत असताना महापौराची प्रतीक्षा करण्याची चुकीची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.शहरामध्ये १ सप्टेंबरपासूनच पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऐनवेळी तो पुढे ढकलावा लागला आहे. वस्तुत: आयुक्त महापौरांशी फोनवर चर्चा करून हा निर्णय घेऊ शकत असतानाही त्याला विलंब लावला जात आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या १४. ६७ टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा २६.७४ टीएमसी एवढा उपलब्ध होता त्यावेळी पाणीकपात लागू करण्यात आली होती. मागील वर्षी १ जून २०१४ अखेर एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला व ५ जुलै २०१४ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. याबाबत उपमहापौर आबा बागूल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र दिले आहे. शहराला आगामी काळात लागणाऱ्या पाण्यासाठी तातडीने पाणीबचतीसाठी नियोजन होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवापर्यंत शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा, उत्सव संपल्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा. मराठवाड्याप्रमाणे पुण्यातील पाण्याची परिस्थिती गंभीर बनू नये, याकरिता आतापासूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. आजच्या तारखेपर्यंत उपलब्ध असलेला पाणीपुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवला जावा, धरणांमधून शेतीला होत असलेला पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्यात यावा, असे आबा बागूल यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.