माजी सरपंच बाजीराव कुंजीर, नितीन कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, पुरंदर तालुका युवक काँग्रेस माजी अध्यक्ष विकास इंदलकर, निवृत्त डी. वाय .एस. पी. कृष्णाजी इंदलकर ,बापूसाहेब तु. कुंजीर ,बाळासाहेब म. कुंजीर, अरुण वि. कुंजीर, ज्ञानदेव आ. कुंजीर, गौतम कुंजीर, सुनील बा. कुंजीर, चांगदेव कुंजीर, कैलास ना. कुंजीर, अरुण सो. कुंजीर, कैलास कुंजीर, शहाजी कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, रमेश नि. कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवीत वाघापूरची सत्ता मिळवली.
भैरवनाथ प्रगती पॅनेलचे विजयी उमेदवार : सौरभ शेखर कुंजीर, शंकर आण्णा कड, रेवती चांगदेव कुंजीर, दीपाली रमेश कुंजीर, कोमल किरण कुंजीर, ताई सुरेश कुंजीर.
भैरवनाथ प्रगती जनसेवा पॅनेलचे विजयी उमेदवार : उज्ज्वला अंकुश इंदलकर, सारिका हरिश्चंद्र कुंजीर व राजेंद्र नामदेव कांबळे.
माजी सरपंच बाजीराव कुंजीर सौरभ कुंजीर म्हणाले, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती त्यात जनतेने जनशक्तीच्या बाजूने कौल दिला. येथून पुढे सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन वाघापूरचा सर्वांगीण विकास करणार आहे.
वाघापूर ( ता. पुरंदर ) येथील भैरवनाथ प्रगती पॅनेलचे विजयी उमेदवारासह मान्यवर ग्रामस्थ.