शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजीपाला, फळांच्या दरात घसरण

By admin | Updated: March 2, 2015 03:18 IST

मुसळधार अवकाळी पावसाचा जबर फटका भाजीपाला आणि फळे यांना बसला आहे. शनिवारी (दि. २८) झालेल्या या पावसामुळे भाजीपाला

पुणे : मुसळधार अवकाळी पावसाचा जबर फटका भाजीपाला आणि फळे यांना बसला आहे. शनिवारी (दि. २८) झालेल्या या पावसामुळे भाजीपाला आणि फळांच्या दरामध्ये सरासरी १० ते २० टक्के घसरण झाली. गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बाजारात रविवारी नेहमीप्रमाणे भाजीपाला, फळे, फुलांची आवक झाली. मात्र, पावसामुळे त्याची पाहिजे तशी खरेदीच झाली नाही. मालाचे ढीग सर्वत्र दिसून येत होते. बहुतेक भाजीपाला आणि फळांच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली. बटाटा, कांदा, भेंडी, पावटा यांचे दर १० ते २० टक्क्यांनी घसरले. काकडी, शेवगा, फ्लॉवर, कोबी, वांगी, तोंडली हे मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले. मागील आठवड्यात काकडीचा १० किलोचा दर २६० ते ३०० रुपये होता. तो आता १२० ते १५० रुपयांवर आला. ८० ते १४० रुपयांवर कोबी ६० ते १२० रुपयांवर घसरला. शेवगा ५००-६०० वरून ४००-४५०, हिरवी कारली ३५०-४०० वरून २५०-३००, वांगी १००-२०० वरून ६०-१४०; तर कळी तोंडली २००-२२० वरून १४०-१५० रुपयांपर्यंत कमी झाली. जवळपास ३० टक्के माल शिल्लक असल्याची माहिती मार्केट यार्डातील अनेक व्यापाऱ्यांनी दिली.रविवारी मार्केट यार्डात कर्नाटकातून ४ ट्रक कोबी, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून १३ ते १४ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून ५-६ ट्रक टोमॅटो, राजस्थानमधून ७-८ ट्रे गाजरांची आवक झाली. १४-१५ टेम्पो फ्लॉवर, १०-१२ टेम्पो कोबी, २-३ टेम्पो शेवगा, ५-६ टेम्पो पावटा, २०० ट्रक कांदा ३०० गोणी लसूण ७० ट्रक बटाटा बाजारात दाखल झाले.फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा : १२०-१५०, बटाटा : ७०-१२०, लसूण २५०-६००, आले : सातारी : ३५०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान : ६००-८०० सुरती : ३००-६००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१५०, कारली : हिरवी : २५०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : १४०-१६०, पडवळ : १३०-१५०, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : ६०-१२०, वांगी : ६०-१४०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-२८०, तोंडली : कळी : १४०-१५०, जाड : ७०-८०, शेवगा : ४००-४५०, गाजर : १००-११०, वालवर : १४०-१५०, बीट : ४०-५०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १२०-१४०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : १८०-२००, मटार : परराज्य २००-२२०, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : १६०-१८०, नारळ : १०००-१२००, मका कणीस : (शेकडा) : २००-३००. (१० किलो) ५०-८०.पालेभाज्यांचे शेकड्यातील दर : कोथिंबीर २००-६००, मेथी ३००-७००, शेपू ३००-६००, कांदापात ५००-७००, चाकवत २००-३००, करडई ३००-४००, पुदिना १००-२००, अंबाडी ३००-५००, मुळे ५००-८००.