याप्रसंगी शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या सयाजी मोहिते, बहुळच्या माजी उपसरपंच दीपाली गणपत आरेकर, साबळेवाडीच्या सरपंच कविता भानुदास काटकर, बहुळ उपआरोग्य केंद्राच्या समोदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजस्विनी पाटील, ग्रामसेविका छाया साकोरे आदीसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान खेळ पैठणीच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक वर्षा प्रकाश आरेकर यांनी पटकाविला. तर द्वितीय क्रमांक सायली हृषीकेश काटकर व आशा तुकाराम काटकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून मानाच्या पैठणी साड्या जिंकल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरती काटकर व स्वप्निल काटकर यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबळेवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गावडे व चांबले यांनी तर ग्रामसेविका छाया साकोरे यांनी आभार मानले.
साबळेवाडी (ता. खेड) येथे हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित महिला.