शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

चासचे ज्ञान मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

By admin | Updated: July 8, 2014 23:35 IST

आंबेगाव तालुक्यातील चास येथे संत ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतलेल्या रेडय़ाचा दशक्रिया विधी झाला होता. ग्रामस्थांनी येथे संत ज्ञानेश्वराचे मंदिर बांधले

मंचर  : आंबेगाव तालुक्यातील चास येथे संत ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतलेल्या रेडय़ाचा दशक्रिया विधी झाला होता. ग्रामस्थांनी येथे संत ज्ञानेश्वराचे मंदिर बांधले असून, ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथे दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात़. ज्ञानमंदिर या नावाने हा परिसर प्रसिद्ध आह़े
सह्याद्रीच्या पर्वतरागांच्या कुशीत व निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या रम्य परिसरात चास हे गाव आहे. गावाच्या पूर्व दिशेला नदी पात्रत 1 कि़ मी़ पर्यंत कुंड आह़े  या कुंडाजवळ संत ज्ञानेश्वराचे मंदिर असून, त्याची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात़  संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ग्याना नावाच्या रेडय़ाकडून वेद वदविले तो रेडा घेऊन ती व त्यांची भावंडे आळंदीस निघाली. जुन्नर तालुक्यातील आळे येथे सर्व आले असता, रेडय़ाचे निधन झाल़े  आतिव दु:खाने ज्ञानदेवांनी ग्यानाचा अंत्यविधी आळे गावात केला़  दशक्रिया विधी दक्षिण वाहिनी पात्रतच करावा, असा विचार करून ते दक्षिण वाहिनी नदीपात्रचा शोध घेत चास येथे पोहोचल़े  ग्याना रेडय़ाची दशक्रिया शास्त्रोक्तविधीनुसार पार पाडून ते भावंडासह आळंदी येथे गेले, अशी अख्यायिका चास ग्रामस्थांनी दिली़
ज्ञानदेवादी भावंडांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या घोडगंगेच्या पात्रत त्याकाळच्या चास ग्रामस्थांनी दगडी चौथ:यावर दगडाचीच एक दगडी समाधी स्थापन केली़  हाच म्हसोबा पुढे शेकडो वर्षे गावचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाऊ लागला़  त्याचा उत्सव दर वर्षी साजरा होत होता़  सन 1959-6क् च्या दरम्यान वैकुंठवासी ह़ भ़ प़ कोंडाजीबाबा डेरे कीर्तनसेवा करताना त्यांनी ज्ञानदेवांचे जीवन चरित्र सांगितले व ज्ञानदेवांच्या रेडय़ाचा दशक्रिया विधी येथे झाल्याने तुम्ही भाग्यवान आहात़  ज्ञानदेवाच्या पदस्पर्शाने तुमचा गाव पावन झाला आहे म्हणून तुम्ही ज्ञानदेवाचे मंदिर उभारा, असे सांगितल़े  त्यानंतर माशाच्या आकाराच्या मंदिरात 1961 साली ज्ञानेश्वरमहाराजांच्या मूर्तीची ग्रामदैवत म्हणून प्रतिष्ठापना करण्यात आली़  (वार्ताहर)