शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

सर्दी, तापावरही टॅमिफ्लूचा मारा

By admin | Updated: March 5, 2015 00:37 IST

स्वाइन फ्लूमुळे शहरात ११ जणांचे बळी गेले आहेत. तसेच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे रुग्ण धास्तीपोटी डॉक्टरांकडे टॅमिफ्लू गोळ्यांची मागणी करीत आहेत.

पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे शहरात ११ जणांचे बळी गेले आहेत. तसेच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे रुग्ण धास्तीपोटी डॉक्टरांकडे टॅमिफ्लू गोळ्यांची मागणी करीत आहेत. डॉक्टरही त्यांना त्या गोळ्या लिहून देत आहेत. शहरातील तीन खासगी औषध दुकानामध्ये या गोळ्या मिळतात. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात टॅमिफ्लू गोळ्या हव्या असतील, तर रुग्णांना रुग्णालयात आणणे बंधनकारक केले आहे, काही जणांना गरज नाही, म्हणून टॅमिफ्लूच्या गोळ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे. एक डॉक्टर सांगतात, गोळ्या घ्या आणि दुसरे डॉक्टर गोळ्या घेण्याची गरज नाही, असे सांगतात. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. त्यामुळे त्यांची धावपळ होऊन ^त्रास सहन करावा लागत आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत असतील, तर टॅमिफ्लू गोळ्या घेण्याची गरज आहे. साधा फ्लू असेल, तर त्यासाठी या गोळ्या खाण्याची गरज पडत नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.स्वाइन फ्लूच्या आजाराने सलग तीन दिवस ३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे साध्या फ्लूचा आजार असणाऱ्यांनीही धास्ती घेतली आहे. त्यामुळे टॅमिफ्लू गोळ्यांचा तुटवडा जाणवत आहे. साप्ताहिक सुट्या रद्दशहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालय व दवाखान्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक व साप्ताहिक सुट्या रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी बुधवारी दिले. सुटीवर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्वाइन फ्लूचा आढावा घेण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात बैठक आयोजित केली होती. त्या वेळी त्यांनी विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)४महापालिकेकडे सध्या १० हजार गोळ्या शिल्लक आहेत. रुग्णांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आली, तर त्यांना चव्हाण रुग्णालयात दाखल करून घेतले जाते, असे डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. खासगी डॉक्टरांकडून काही रुग्ण गोळ्या घेण्यासाठी येतात. त्यांची फेरतपासणी करण्यात येते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास गोळ्या देण्यात येतात. सध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या ठिकाणाहून या गोळ्या खरेदी करणे आवश्यक आहे. - डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारीशहरामध्ये फ्लूचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नागरिक घाबरलेले आहेत. तपासणी केल्यानंतर लक्षणांची तीव्रता पाहून गोळ्या देण्यात येत आहे. जास्तीत जास्त रुग्ण हे फ्लूसबंधीचे आहेत. - डॉ. ए. एस. गोसावीजास्तीत जास्त रुग्ण सर्दी, ताप, खोकला या आजारांचे येत आहेत. त्यांच्यामध्ये लक्षणांची तीव्रता दिसली, तर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात येते. - डॉ. प्रवीण आव्हाडपालिकेतर्फे तपासणी सुरू ४शहरात ज्या भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. त्या भागात तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक नियुक्त केले आहे. घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.मोशीतील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यूस्वाइन फ्लूमुळे शैलेजा दिनकर माने (वय ४५ रा. स्पाइन रस्ता, मोशी) यांचा चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मुत्यू झाला. त्यांना १६ फेब्रुवारीला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना तीन ते चार दिवस आधी ताप येत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल ४ दिवसांनी रुग्णालयाला प्राप्त झाला होता. त्यामध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. शहरात स्वाइन फ्लू झालेले नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत, तर ४६ जणांच्या थुंकीचे नमुने तापसणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. ५ हजार ३१६ तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. त्यामध्ये एक हजार २३१ जणांना सर्दी, खोकला असे आजार आढळून आले. त्यातील २९१ जणांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ४२ जण उपचार घेत आहेत. शहरात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत आहेत.