शिरसगाव काटा : न्हावरे-इनामगावमार्गे एसटी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
न्हावरे ते इनामगाव हा मार्ग शिरूर व दौंड, नगर या तालुक्यांना जोडणारा दुवा मानला जातो. तसेच, श्रीक्षेत्र सिद्धटेक गणपतीला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग मानला जातो.
या रस्त्यावर प्रामुख्याने निर्वी, शिरसगाव काटा, चव्हाणवाडी, पिंपळसुटी, इनामगाव ही गावे येतात. परिसरातील विद्याथ्र्याना शिरूर, काष्टी, पुणो या भागात शिक्षणासाठी जायचे झाल्यास सकाळच्या
वेळेतील सिद्धटेक-पुणो ही गाडी सोडल्यास न्हावरेमार्गे एकही एसटी नाही. पूर्वी पुण्याला जाण्यासाठी मुक्कामी व दुपारची गाडी होती.
परंतु, काही दिवसांपूर्वी दुपारची
गाडी बंद आहे. तसेच या मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारी शिरूर-मांदळी एसटीही बंद आहे.
सध्या पुण्याला जाण्यासाठी सिद्धटेक-पुणो ही एकच गाडी शिक्रापूरमार्गे आहे. तसेच, निर्वीमार्गे फक्त चारच फे:या होत आहेत. न्हावरेमार्गे एकच गाडी असल्याने शेतक:यांना, विद्याथ्र्याना व महिलांना तासन्तास खासगी वाहनांची वाट पाहावी लागते.
शिरसगाव येथील ज्येष्ठाला प्राणाला मुकावे लागले आहे. निर्वी व पिंवळसुटी या विद्यालयातील विद्याथ्र्याना एसटीच नसल्याने अनेकदा पायीच प्रवास करावा लागतो.
यापूर्वी न्हावरे व इनामगावमार्गे शटलसेवा सुरू करण्यात
आली होती; परंतु काही कारणास्तव ही सेवा बंद करण्यात आली.
या गैरसोयीने नागरिक त्रस्त
झाले असून, शिक्रापूरमार्गे
पुण्याला जाण्यासाठी दोन
गाडय़ा, तसेच सकाळच्या 3 व दुपारच्या 12.3क् व सायंकाळी
8.3क् दरम्यान फे:या सुरू कराव्यात. तसेच, श्रीक्षेत्र मांदळी येथे
जाणारी शिरूर-मांदळी ही गाडी
दररोज सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास
घाडगे यांनी केली आहे. (वार्ताहर)
4रविवारचा न्हावरे गावचा बाजार दिवस असल्याने इनामगाव व परिसरातील ग्रामस्थांना बाजाराला यावे लागते; परंतु प्रवासाचे साधन नसल्यास अवैध वाहतुकीत दाटीत जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेकदा अपघात घडले आहेत.