ओझर : अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांतील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री अकरापर्यंत सुमारे दीड लाख भविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती विघ्नहर गणपती देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे व उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे यांनी दिली. तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे वरुणराजाच्या आगमनासाठी भाविकांनी ‘श्रीं’ना साकडे घातले.पहाटे चारला पुजारी हेरंब जोशी यांनी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त देवीदास कवडे, बाळासाहेब कवडे, विक्रम कवडे, पांडुरंग जगदाळे, बबन मांडे, साहेबराव मांडे, उद्योजक बी .व्ही. मांडे, बी. एल. शिंदे गणेशभक्त प्रवीण व संजय बारसे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची महापूजा करण्यात आली व त्यानंतर मंदिर भविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.देवस्थानच्या वतीने दर्शनरांग, वाहनतळ, अभिषेक व्यवस्था, स्वागतकक्ष सर्व चोख नियोजन केले होते. वारकऱ्यांना भालचंद्र रवळे यांनी अन्नदान दिले. आळंदीच्या स्वकाम संस्थेच्या भविकांनी मंदिर परिसर स्वच्छता केली. स्वागत कक्षातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, पांडुरंग कवडे, प्रकाश मांडे यांनी भविकांचे स्वागत केले. विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, शिर्डी नगरपालिकेचे अध्यक्ष कैलास कोते, उद्योजक शांताराम पिसाळ आदी भविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. (वार्ताहर)
वरुणराजासाठी साकडे
By admin | Updated: September 2, 2015 04:13 IST