शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पथारी विक्रेत्यांना हवी सुरक्षितता

By admin | Updated: November 16, 2016 03:12 IST

अतिक्रमण विभागाचा जाच कमी करावा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून पथारीवाल्यांचे पुनर्वसन करून स्मार्ट सिटीमध्ये

पुणे : अतिक्रमण विभागाचा जाच कमी करावा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून पथारीवाल्यांचे पुनर्वसन करून स्मार्ट सिटीमध्ये आम्हालाही सामावून घ्या, अशी पथारीवाल्यांची मागणी आहे. अपवादानेच पुण्यात एखादा रस्ता असा असेल, की त्यावर पथारी विक्रेते नाहीत. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग असे बहुतेक रस्ते विक्रेत्यांनी कायम गजबजलेले असतात. हातरुमालापासून कोटापर्यंत व साध्या टिकल्यांपासून ते महागड्या साड्यांपर्यंत सगळे काही त्यांच्याकडे मिळते.दिवसाच्या (व रात्रीच्याही) वेगवेगळ्या वेळचे विक्रेते वेगवेगळे आहेत. अगदी सकाळी काही जण नाष्टा विक्री करतात. स्टिलच्या डब्यांमध्ये इडली, उपमा, पोहे असे पदार्थ ठेवून त्याची विक्री करतात. सकाळ संपून दुपारची सुरुवात झाली की मग लहान मुलांचे कपडे, महिलांची सौंदर्यप्रसाधने अशा मालाची विक्री लक्ष्मी रस्त्यासारख्या व्यापारी पेठांमध्ये सुरू होते. संध्याकाळ झाली की भेळेपासून चायनिज खाद्यपदार्थ करणाऱ्या विक्रेत्यांची मक्तेदारी सुरू होते. अगदी रात्री काही ठराविक पदपथांवर भाजीपोळी, भातवरण असे जेवणही मिळते. ते खाणारेही विक्रेतेच असतात व विकणारेही विक्रेतच!शहरात सध्या सर्व मिळून एकूण ३ हजारांपेक्षा जास्त पथारी व्यावसायिक (रस्त्यावरील विक्रेत्यांचे सरकारी नाव) आहेत. रस्त्यावरची त्यांची जागा ठरलेली असते. ती रस्त्यावरची असली तरीही एखाद्याच्या दुकानापुढची असेल तर तो दुकानदार किंवा मग महापालिकेचे कर्मचारी, बरेचदा पोलीस अशांना पैसे द्यावेच लागतात. शहराच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी लहानशा जागेवर त्यांचा संसार असतो. रस्त्यावर विक्री करूनच ते तो चालवित असतात. असा व्यवसाय करताना करावा लागणारा गुुंडगिरी, हप्तेवसुली यांच्याशी संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. तो करीतच त्यांना व्यवसाय करावा लागतो.जप्त केलेला माल सोडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे या सगळ्या त्रासाचा कळसच. त्यासाठी विशिष्ट नमुन्याचा अर्ज लिहून द्यावा लागतो. तो विशिष्ट कर्मचाऱ्यांकडेच द्यावा लागतो. तो कधीही जागेवर नसतो. असला तरी तो दंडाची रक्कम स्वीकारत नाही. त्यासाठी पुन्हा दुसऱ्याच कर्मचाऱ्याकडे खेटे घालावे लागतात. एवढे करून हातात काही पडेल याची खात्री नाही. उपयोगी पडणाऱ्या मालाची आधीच विल्हेवाट लागलेली असते. निरुपयोगी साहित्याची तोडफोड झालेली असते. एक नागरिक म्हणून हे शहर आमचा विचार करणार आहे का? ही त्याची हाक कोणापर्यंत पोहोचणार नाही याची खात्री असल्यामुळेच अशा प्रकारची कारवाई झाली की माल परत मिळविण्याच्या फंदात बहुसंख्य विक्रेते पडत नाहीत. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर, त्याच वेळेस उभे राहण्यासाठी लागणारे भांडवल मिळविण्याच्या तयारीला ते लागतात.