शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केलेली पुस्तके धूळ खात; विद्यार्थी संतप्त

By admin | Updated: July 29, 2016 03:50 IST

महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या येथील स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून संदर्भ ग्रथांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेगवेगळी कारणे

निगडी : महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या येथील स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून संदर्भ ग्रथांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेगवेगळी कारणे देऊन प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी महापालिकेमार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी अभ्यासकेंद्र सुरू केली होती. विविध स्तरांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेऊन त्यांची नोंदणी करूनच आपण पुस्तके देऊ, एवढे एकच कारण गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र आजपर्यंत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेतली गेली नाही आणि नोंदणीही करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी आणखी पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. मात्र आजपर्यंत लाखोंची ही सगळी पुस्तके धूळ खात पडली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांच्या आवृत्त्या जुन्याही झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे संदर्भ ग्रंथ सामान्य परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. मात्र प्रशासनाकडे पुस्तके असूनही ती अभ्यासासाठी दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या पार्किंगमधून अनेक मुलांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत. स्वच्छतागृहाची स्वच्छता नीट केली जात नसल्याची तक्रारही मुला-मुलींकडून होत आहे. अशा त्रासाने अनेक मुलांना खासगी अभ्यासिकांमध्ये प्रवेश घ्यावा लागला आहे. या अभ्यास केंद्रातील आतापर्यंत ३२ तरूण -तरूणी वेगवेगळया खात्यांमध्ये अधिकारी पदावर नियुक्त झाले आहेत. त्यामुळे या अभ्यास केंद्रामध्ये गर्दी वाढत आहे. सहायक कक्ष अधिकारी आणि कर सहायक या दोन परिक्षा जवळ आल्या असल्याने रविवारीही अभ्यासकेंद्र सुरू असावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)काही दिवसांपूर्वी या अभ्यासकेंद्रातील कर्मचारी मनमानी पद्धतीने अभ्यास केंद्राला सुटी देत असे. यासंदर्भात एका विद्यार्थ्याने सारथीवर तक्रार केली होती. याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून रविवारी साप्ताहिक सुटीच जाहीर करुन टाकली. शिवाय माझी तक्र ार करता काय, मी कोण आहे, हे दाखवूनच देतो, असा दमही विद्यार्थ्यांना दिला होता. त्यामुळे विद्यार्थी तक्रार द्यायला घाबरतात.