शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

शिवसेना सर्वसामान्यांसाठीच

By admin | Updated: October 1, 2014 00:37 IST

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित असून, या सत्तेचा उपयोग गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला ताकद देण्यासाठी केला जाईल,’

पुणो : ‘आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित असून, या सत्तेचा उपयोग गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला ताकद देण्यासाठी केला जाईल,’ अशी ग्वाही पर्वती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे यांनी आज दिली. मी तळागाळाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता असून,  आमदार झाल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. 
पर्वती मतदारसंघातील शिवसेनेतर्फे महर्षीनगर येथे महिला मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. त्या वेळी तावरे बोलत होते. उपशहर प्रमुख बाळा ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, कौस्तुभ देशपांडे, नितीन कांबळे, अर्जुन जानगवळी, आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
‘शिवसेनेच्या कार्यकत्र्यामध्ये जी ताकद आहे, ती अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकत्र्यात नाही. गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या कार्यकत्र्याचे प्रचाराचे कार्य कौतुकास्पद आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी माङयावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला कदापी तडा जाऊ देणार नाही. त्याच विश्वासावर पर्वती मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या मागे माणसे नाहीत, त्यांच्या खिशात पैसे आहेत. अशा उमेदवारांच्या आमिषाला बळी पडू नका. तसेच, जे निवडून आले; पण मतदारसंघात कधीच फिरकले नाहीत, त्यांना आता थारा देऊ नका,’ असे आवाहन तावरे यांनी केले. 
ते म्हणाले, ‘पर्वती मतदारसंघात शिवसेना आणखी मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. झोपडपट्टीतील गोरगरीब व सामान्य जनतेशी माझी नाळ जुळली आहे. महिला सक्षमीकरणाला आम्ही 
सदैव प्राधान्य दिले आहे. 
घरातील एका महिलेला 
ताकद दिली, तर संपूर्ण कुटुंब 
सक्षम होते, असा आमचा विश्वास आहे, त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी माङया पाठीशी खंबीरपणो उभे राहा.’ 
 
आदित्य ठाकरे यांची गुरुवारी रॅली
पर्वर्ती विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन तावरे यांच्या प्रचारार्थ 2 ऑक्टोबरला (गुरुवारी) दुपारी 2 वाजता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पर्वर्ती मतदारसंघात शिवसेनेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे, असे बाळा ओसवाल यांनी सांगितले.
 
युवा नेते सचिन तावरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने पक्ष आणखी मजबूत होणार आहे. पर्वती मतदारसंघात भगवा ङोंडा फडकविण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करणार आहेत.’’ 
- श्रीकांत पुजारी, माजी नगरसेवक
गेल्या 5 वर्षात पर्वती मतदार संघातील 
आमदार कोणाला दिसले का ? 
असा सवाल करीत शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे मात्र नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहतील.’’ 
- बाळा ओसवाल, उपशहरप्रमुख