हिंगणे, सिंहगड रोड, महादेवनगर येथे भगवा झेंडा (पताका) व पुस्तक वाटप प्रत्येक घरात देण्यात आले. आबा जगताप, अजय खुडे, नितीन शिंदे, दत्ता करंजकर, पप्पू कोंडे, लीलाबाई शेलार, सावित्रीबाई भवर, आबा सातपुते यांच्या हस्ते महिला व नागरिकांना भगवा पताका व पुस्तक देण्यात आले.
हा कार्यक्रम मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.
या वेळी देवदास लोणकर, मल्लीनाथ गुरवे, लहू निवंगुणे, किशोर रायकर, अतुल कार्ले, अवधुत मते, वैशाली खाटपे, सुरेश मते, सागर मारणे, नाना खुणे, गणेश मिटकरी, रफिक पठाण, बाळासाहेब प्रताप, सिद्धार्थ खुणे, महेश खुणे, अमर निवंगुणे आदी उपस्थित होते.