महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:39 IST2025-12-15T13:37:42+5:302025-12-15T13:39:40+5:30

येत्या बुधवारपासून या दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या प्रभागात कोणाचे पारडे जड आहे, याचा विचार करून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance in Maharashtra Shiv Sena Thackeray group MNS to start discussions on seat sharing | महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार

महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धवसेना आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज चाय पे चर्चा झाली. उद्धवसेनाच्या कार्यालयात ही बैठक झाली. या दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या प्रभागात कोणाचे पारडे जड आहे, याचा विचार करून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार आहे. त्या दृष्टिकोनातून पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची पावले पडू लागली आहेत. या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, वसंत मोरे, प्रशांत बधे तर मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, बाळा शेडगे, आदी उपस्थित होते. यावेळी पालिका निवडणुकीबाबत अनौपचारिक चर्चा झाली.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी सोमवारी मनसेच्या कार्यालयात जाणार आहेत. त्यानंतर येत्या बुधवारपासून या दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या प्रभागात कोणाचे पारडे जड आहे, याचा विचार करून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे.

Web Title : पुणे में शिवसेना (यूबीटी) और मनसे गठबंधन पर बातचीत शुरू

Web Summary : आगामी नगर निगम चुनावों के लिए उद्धव सेना और मनसे के नेता पुणे में मिले। सीट बंटवारे से पहले वे वार्ड की ताकत का विश्लेषण करेंगे। पुणे नगर निगम चुनावों के लिए संभावित उद्धव-राज ठाकरे गठबंधन को मजबूत करने का उद्देश्य।

Web Title : Shiv Sena (UBT) and MNS Alliance Talks Begin in Pune

Web Summary : Uddhav Sena and MNS leaders met in Pune to discuss a potential alliance for upcoming municipal elections. They will analyze ward strengths before seat sharing talks begin. Discussions aim to solidify a possible Uddhav-Raj Thackeray coalition for the Pune Municipal Corporation elections.