शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

आविष्कार संशोधन स्पर्धेत पुणे अव्वल

By admin | Updated: January 23, 2015 23:51 IST

नागपूर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय नवव्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले आहे.

पुणे : नागपूर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय नवव्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले आहे. संशोधन प्रकल्पांसाठी विद्यापीठातील विविध शाखांतील ८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून, ६ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना दुसरा क्रमांक मिळाला.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी दरवर्षी ‘आविष्कार’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे हे नववे वर्ष होते. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ ची स्पर्धा नागपूर येथील महाराष्ट्र पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये दि. २१ ते २३ जानेवारी या कालावधीत उत्साहात पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शाखांतील एकूण ४८ विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना पुरस्कार मिळाले. आठ विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक तर सहा विद्यार्थ्यांना दुसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील एकूण ६ विद्याशाखानिहाय पारितोषिकांपैकी तीन पारितोषिकेही विद्यापीठाला मिळाली आहेत. विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीवर विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या स्पर्धेत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सात वेळा या स्पर्धेवर नाव कोरले आहे. स्पर्धेतील पहिली पाच वर्षे पुणे विद्यापीठाचे वर्चस्व होते. स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राजभवन आविष्कार फेलोशिप दिली जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे विशेष कार्याधिकारी डॉ. रवींद्र जायभाये यांनी दिली. (प्रतिनिधी)१. मानव्य विद्या, भाषा व ललित कला : शमिका खटावकर, संदीप आरोटे२. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी : रती चंद्रा, आनंद कोल्हारकर३. विज्ञान : मंदार वजगे४. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान : तुषार दामले, योगेश कुलकर्णी, गिरीश मोडक, रामकृष्ण मोरेश्वर५. कृषी व पशुपालन : स्वरुपा चौधरी६. वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र : रुचा वितोंडे, स्वाती सक्सेना, श्रद्धा हिडादुगी, वंदना गावंडेसंशोधनाला प्राधान्य देणार विद्यापीठाने नेहमीच शिक्षणाबरोबर संशोधनालाही प्राधान्य दिले आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालये तसेच विविध विभागांनी संशोधनात चांगले काम केले आहे. आविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय असेच आहे. विद्यापीठामध्ये यापुढेही संशोधनाला प्राधान्य दिले जाईल.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ