PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध भोवला, प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:34 IST2025-12-23T10:32:25+5:302025-12-23T10:34:04+5:30

आपली राजकीय जागा टिकवण्यासाठी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील नेते व इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे.

PMC Elections A setback for the NCP-Sharad Pawar faction before the municipal elections? Pune City President Prashant Jagtap preparing to resign | PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध भोवला, प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध भोवला, प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यास राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रपवार पक्षाने दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत स्थापन केलेल्या समितीमधुन प्रशांत जगताप यांना वगळण्यात आले आहे. त्याने नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अदयाप हा राजीनामा स्विकारलेला नाही.

आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा या समितीत प्रवेश आहे. या समितीतून पुणे शहराध्यक्षपदी असलेल्या प्रशांत जगताप यांना वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांची आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत जगतापांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुप्रिया सुळे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रशांत जगताप यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबईला भेटीसाठी बोलाविल आहे.

महाविकास आघाडी म्हणून आपण पुणे महापालिकेची निवडणूक लढवली पाहिजे, असा माझा प्रस्ताव आहे. मात्र, तरी पक्षाचे नेते म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार हा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आहेत. सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी आज संध्याकाळपर्यंत माझा अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. सध्या तरी मी राष्ट्रवादी पक्षात होतो आणि आहे. पण चर्चेनंतर माझा पुढचा मार्ग ठरेल, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, “प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे अद्याप आलेला नाही. काल आमची कोर कमिटीची बैठक होती, कोर कमिटीच्या बैठकीनंतर मी अनेक लोकांशी चर्चा केली. पुण्यात भाजपाने ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश घेतले आहेत, ते पाहता भाजपाच्या विरोधात सर्वजण एकत्र आलं पाहिजे असं कोर कमिटीच्या बैठकीतील सर्वांचं म्हणणं होतं.

Web Title : पुणे राकांपा गुट को झटका: प्रशांत जगताप का इस्तीफा?

Web Summary : पीएमसी चुनावों के बीच, पुणे राकांपा के प्रशांत जगताप इस्तीफा दे सकते हैं, किसी अन्य पार्टी में शामिल हो सकते हैं। इस फैसले के बाद राजनीतिक बदलावों की आशंका है। विभाजन और नेताओं के संभावित रूप से भाजपा में शामिल होने के कारण पार्टी को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है।

Web Title : Pune NCP Faction Faces Setback: Prashant Jagtap Resigning?

Web Summary : Amidst PMC elections, Pune NCP's Prashant Jagtap may resign, joining another party. Political shifts are anticipated following this decision. The party faces challenges due to divisions and leaders potentially joining BJP.