राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या दप्तरदिरंगाईमुळे नव्याने पदोन्नती घेतलेल्या पदवीधर शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेचा फटका बसणार आहे.
पुणो जिल्हा परिषदेने जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात जिल्ह्यातील शिक्षकांची पदवीधर शिक्षक पदोन्नतीची ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकरीत्या पार पडली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील पदवीधर शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी 1 ऑगस्ट रोजी हजर होण्याचे सुस्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिका:यांनी दिले आहेत.
त्याप्रमाणो अनेक तालुका पंचायत समितीने संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त आदेश देऊन जिल्हा परिषदेच्या आदेशाचे पालन केले. मात्र, खेड पंचायत समितीने दहा दिवसांर्पयतचा कालावधी दप्तरदिरंगाईत व्यस्त घालवून 4 ऑगस्टला शिक्षकांची जिल्ह्यातील इतर शिक्षकांच्या तुलनेत सेवाज्येष्ठता खाली आली. याला केवळ शिक्षण विभागाची दप्तरदिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे.
पदवीधर शिक्षकांना 43क्क् ग्रेड पे असताना ऑगस्टच्या पगारात 4287 रुपये आकारून एक प्रकारे पंचायत समितीने आर्थिक नुकसान केले आहे. नगण्य आर्थिक झळ असली, तरी सेवाज्येष्ठता क्रमांक खाली घसरण्यास जबाबदार असणा:यांची चौकशी होऊन संबंधिताना न्याय मिळावा, अशी मागणी शैक्षणिक वतरुळातून जोर धरत आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिका:यांच्या आदेशचाही खेड पंचायत समितीने अवमान केल्याचा ठपका शिक्षक खासगीत व्यक्त करीत आहेत.
यासंदर्भात पदवीधर शिक्षकांचे एक शिष्टमंडळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांची भेट घेणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)
4खेड पंचायत समितीची दप्तरदिरंगाई
4पदवीधर शिक्षकांची सेवाज्येष्ठता ढासळणार.
4मुख्य कार्यकारी अधिका:यांच्या आदेशाची खेडमध्ये पायमल्ली
4पदवीधर शिक्षकांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेकडे मागणार दाद.