शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भोरच्या बाजारावर नोटाबंदीचा परिणाम

By admin | Updated: November 16, 2016 03:04 IST

पाचशे व हजारच्या नोटाबंदचा परिणाम मंगळवारच्या भोरच्या आठवडेबाजारावर दिसून आला. बाजारात ग्राहक कमी झाल्याने बाजारावर

भोर : पाचशे व हजारच्या नोटाबंदचा परिणाम मंगळवारच्या भोरच्या आठवडेबाजारावर दिसून आला. बाजारात ग्राहक कमी झाल्याने बाजारावर ५० टक्के मंदीचे सावट दिसून आले. त्यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना आपला माल परत घरी घेऊन जावे लागले.भोर शहरात दर मंगळवारी आठवडेबाजार भरतो. या बाजाराला शिरवळ, लोणंद, सासवड, फलटण, महाड व भोर तालुक्यातील विविध गावांतून भाजीपाला, कडधान्य, फळे, कपडे, चप्पल, खाऊ, मासे, बोंबिल अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारे सुमारे ४०० ते ४५० लहान मोठे व्यापारी येतात.खरेदीसाठी भोर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी खरेदीसाठी येतात. साधारणपणे ८० ते ९० लाखांची उलाढाल दर मंगळवारी या बाजारात होते. यामुळे अनेकांचे संसार चालतात. मात्र, नोटा बदलून मिळत नसल्याने सदरची उलाढाल ५० टक्क्यांवर आली आहे. बाजारात १०, २०, ५०, १०० रु. नोटांचे सुटे पैैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक जण बाजाराला येऊनही त्यांना बाजार न करताच परत जावे लागले. व्यापाऱ्यांचा ६० टक्के माल विकला गेला नाही. पालेभाज्या व इतर बाजार खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजार संपत आला, तरी २० टक्के माल खपला नाही. सदरचा माल पुन्हा गावाला घेऊन जावा लागणार असल्याने जाणे-येण्याचा खर्च व दिवभर बसण्याचा रोजही निघाला नाही, असे पुरंदर तालुक्यातून आलेले फळ व्यापारी इरफान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.अनेकांना माल उधार दिलेला आहे. आणलेला मालही खपला नाही. त्यामुळे पुन्हा गावाला परत घेऊन जाण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे उधारीवरही माल विकला असल्याचे सासवडचे भाजी व्यापारी विजय ढेरे, हर्णसचे विलास भिकाजी हिरगुडे यांनी सांगितले. बँकेतही सुटे मिळत नसल्याने दर मंगळवारी भाजीपाला इतर बाजार खरेदी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असे गृहिणी वर्षा शिंदे व सुशीला खुटवड यांनी सांगितले. (वार्ताहर)