====
खासगी सहभागातून काय काय होणार?
* पीपीपी मॉडेलद्वारे रस्त्यांची ५८१ कोटींची कामे केली जाणार.
* कामाच्या बदल्यात विकसकाला क्रेडिट नोट देण्यात येणार
* सारसबाग उद्यान आणि पेशवे उद्यान यांचा विकास
* पंतप्रधान आवास योजना राबविणार
* पालिका कर्मचारी वसाहती पुनर्वसन
* अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणे
* आयटी स्टार्टअपसाठी निधी देणार
====
1. समाविष्ट ११ गावांसाठी मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारणे
2. बाणेरमध्ये ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प
3. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय
4. फुरसुंगी आणि देवाची उरुळी येथे टीपी स्कीम
5. चार नवीन उड्डाणपुलांची होणार निर्मिती
6. नव्याने घेणार ५०० इलेक्ट्रिक बस
====
२३ गावांमधील करावर मदार
पालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधील वाघोली, बावधन, सूस, म्हाळुंगे आदी विकसित झालेली गावे येणार आहेत. या गावांमधून उत्पन्न मिळण्याची आशा आहे. यासोबतच मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. तसेच या गावांमधून बांधकाम परवाना शुल्कामधून उत्पन्न मिळणार आहे. या गावांमधील अॅमेनिटी स्पेस, बांधकाम परवाना शुल्क आणि मिळकतकरावरही बरीचशी मदार ठेवण्यात आली आहे.