खेड पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत खेड तालुक्यातील कोविड सेंटरची पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याची मागणी या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.
खेड तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांसाठी चांडोली येथील समाजकल्याणचे वसतिगृह आणि म्हाळुंगे येथे म्हाडामध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले. आता चांडोली कोविड सेंटर एक महिन्यापूर्वी बंद करण्यात आले, तर म्हाळुंगे कोविड सेंटरच्या म्हाडा इमारती खाली करण्यास सांगण्यात आल्याने कोविड सेंटर पर्यायी जागा उपलब्ध करण्यास महसूल आरोग्य प्रशासनाने अद्यापही याबाबत हालचाली करण्याबाबत ठोस पाऊल उचलले नसले, तरी संशयित कोविड तपासणी बंद करू नये यासाठी तत्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबरोबरच प्रजासत्ताक दिन या अनुषंगाने झालेली गर्दी पाहता रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली होती आणि १ फेब्रुवारीनंतर रुग्णवाढीचा आलेख दररोज कमी-जास्त होताना दिसत आहे. कोरोना नागरिकांच्या मनातील भीतीचे सावट आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे चित्र दिसत असले, तरी मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड सेंटरचे चंबुगबाळे आवरण्याची नामुष्की आली असली, तरी तालुक्यातील जनतेला कोरोना चाचण्या आणि कोविड सेंटर पर्यायी जागा उपलब्ध करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.