पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून केवळ 1.3क् अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. हा साठा 15 ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे नियोजन केले आहे. हवामान खात्याने 11 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पाणीसाठय़ाच्या नियोजनाची बैठक 11 जुलैला बोलावण्यात आली आहे. त्यास जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. त्यात अतिरिक्त पाणीकपातीबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
गेल्या वर्र्षी पुणो शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत 5 टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, या वर्र्षी एक महिना पाऊस लांबल्याने धरणातील पाणीपातळी खालावली आहे. दुष्काळी कामांसाठी 55 कोटी खर्च करण्यात आले असून, जिल्हा नियोजन समितीकडून जलसंधारण कामासाठी 15 टक्के निधी घेण्यात येईल.
पावसाने ओढ दिल्याने त्याची ख:या अर्थाने झळ पुढील उन्हाळ्य़ात जाणवेल. त्यामुळे पडणा:या पावसाचे पाणी साठविण्यासाठी या निधीचा उपयोग होईल. तसेच, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अधिकाधिक शेतक:यांनी पीकविमा काढावा यासाठी गुरूवारी बँकांची बैठक बोलावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)