पिंपरी : देखावा पाहण्यासाठी येणा:या शेकडो गणोशभक्तांच्या सुरक्षेसाठी अनेक सार्वजनिक गणोश मंडळे मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवीत होते.
मात्र, यंदा कॅमेरे लावणा:या मंडळांची संख्या घटली आहे. पुण्यातील बॉम्बस्फोटाच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर मंडळांचा हा निष्काळजीपणा सार्वजनिक सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया सजग नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
महापालिकेतर्फे गणोश मंडळांच्या पदाधिका:यांची बैठक गेल्या महिन्याच्या 14 तारखेला संत तुकारामनगरातील आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. यात पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी बॉम्बस्फोट व घातपाताच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था योजना राबविण्याचे आवाहन केले होते. या संदर्भात कार्यकत्र्यानी दक्षता घेण्याच्या विविध सूचना केल्या. याच्यासह अनेक पोलीस अधिका:यांनी या प्रकारच्या अनेक सूचनांचा भडिमार केला होता.
मात्र, कार्यकत्र्याच्या उदासीनतेमुळे अनेक मंडळांनी मंडप परिसरात यंदा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. मोजक्याच मंडळांनी मंडपाभोवती कॅमेरे बसविले आहेत. यंदा मंडळाच्या वर्गणीत घट झाली आहे. दर वर्षी मिळणारे देणगीचे प्रमाण कमी झाले आहे. स्वागत कमानी आणि जाहिरातीसाठी व्यावसायिक व उद्योजकांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मंडळांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.
त्याचा परिणाम म्हणून सीसीटीव्ही कॅमे:याचे 1क् दिवसांच्या भाडय़ावरील खर्चास फाटा दिला गेला आहे. ताबडतोब परवाने दिले जातील, असे नेहमीच महापालिका व पोलीस बैठकीत सांगितले जाते.
मात्र, पोलिसांकडून अनेक कागदपत्रंची मागणी केली जाते. त्यासाठी पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागतात. वर्गणी गोळा
करणो, मंडप बांधणो, देखावा तयार करणो आदीसह विविध कामे
सोडून कार्यकत्र्याना परवान्यांसाठी धावाधाव करावी लागते. पोलिसांकडून होणा:या या जाचामुळे त्रस्त कार्यकर्ते त्यांना सहकार्य करण्यास नाखूष असतात. (प्रतिनिधी)
2 कॅमे:यांचे भाडे 8 हजार रुपये
4संपूर्ण सेटसह 2 कॅमे:यांचे 1क् दिवसांचे भाडे 8 हजार रुपये आहे. मोठय़ा मंडळाच्या ठिकाणी 4 व त्यापेक्षा अधिक कॅमेरे बसवावे लागतात. त्यामुळे त्याचा खर्च वाढतो. हा खर्च वाचविण्याकडे मंडळांचा कल आहे.
सुरक्षेसाठी 4 कॅमेरे आहेत
नेहरुनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाने यंदा प्रथमच 4 कॅमेरे बसविले आहेत. त्याचे 24 तास रेकार्डिग केले जाते. ते सर्व सेव्ह केले जाते. आवश्यकता भासल्यास हे रेकार्डिग पाहिले जाते. भाडे जास्त असल्याने थेट सेटच विकत घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मोडक व कार्याध्यक्ष अजय पाताडे यांनी सांगितले. या पद्धतीने इतर मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलिसांच्या सक्तीमुळे मोठय़ा मंडळांत कॅमेरे
4मोठय़ा मंडळाना पोलिसांनी कॅमेरे लावण्याची सक्ती केली आहे. यामुळे नाईलाजास्तव मंडळांनी कॅमेरे बसविले आहेत. मोठय़ा प्रमाणात गर्दी खेचणा:या मंडळांनी कॅमेरे लावले आहेत. मात्र, ही संख्या जास्त नाही. शहरात एकूण 1 हजार 4क्8 सार्वजनिक मंडळे आहेत. त्यातील 798 नोंदणीकृत आहेत.